Maratha Reservation : मनोज जरांगेंना अटक करा, नार्को टेस्ट करा; प्रवीण दरेकरांची मागणी

Maratha Reservation : मनोज जरांगेंना अटक करा, नार्को टेस्ट करा; प्रवीण दरेकरांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले आहेत. अशात आता जरांगे पाटील यांना अटक करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. (Arrest Maratha Reservation Protester Manoj Jarange, Do Narco Test; BJP MLA Praveen Darekar’s demand)

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी झाली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कसे चिघळले? आंदोलनात दगड आणि जेसीबी कुठून आले? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? ते दोन सदस्य कोणत्या पक्षाचे होते असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

Manoj Jarange : “चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो”; SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी शोधणारच असा इशारा दिला. ते म्हणाले. जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, तोच असा आई-बहिणींवरुन शिव्या देतो त्याचे दुःख वाटते. पण माझी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी तक्रार नाहीच. मी त्यांच्या मागील बोलवता धनी शोधणार आहे.

Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’

सप्टेंबर महिन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन चिघळले, असे म्हटले जाते. लाठीचार्जनंतर झालेही असेल. पण त्याचबरोबर कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगे पाटील यांना परत आणले. त्यांच्या घरात जाऊन कोण भेटले, कोणाकडे बैठक झाली या सगळ्याची चौकशी करणार आहे. आता आरोपी देखील सांगत आहेत, की यांच्या सांगण्यावर आम्ही दगडफेक केली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागील बोलवता धनी शोधणार असा इशारा फडणवीस यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube