सुपर व्हिलन अभिनेता किरण माने यांना मराठी मालिकांमधून चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. माने अलीकडच्या काळात सोशल मीडियावरही अधिक प्रमाणात सक्रिय असल्याचं दिसून आले आहेत. त्यांच्या अनेक विषयांवर पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांकडून त्यांच्या पोस्ट संमिश्र कमेंटस् देण्यात येत असतात. अशाच एका ट्रोलर्सवर त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सुनावलंय. किरण मानेंच्या पोस्टवरुन माने यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या सागर बर्वेला अटक करण्यात आलीय.
सागर बर्वेला अटक करण्यात आल्यानंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत सागरचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. पोस्टच्या माध्यमातून माने त्यांची समजूतही काढत असल्याचं दिसून येत आहे.
नगरमध्ये अक्षय भालेराव हत्याकांडाचे पडसाद! आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा…
किरण माने पोस्टमध्ये म्हणाले, “मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास ! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते”.
गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? पण आज तू तुरूंगात गेल्यामुळं शरमेनं मान खाली घालावी लागली की नाही बिचार्यांना? आजकालच्या ‘फॅशन’नुसार काहीजण तुझ्या जातीवर जातील.
संभाजी भिडे चोख पोलीस बंदोबस्तात पालखी मार्गावर
जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत. चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव ‘सागर’ ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.
अजूनही जागा हो माझ्या मित्रा. वेळ गेलेली नाही. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकीशी प्रतारणा करू नकोस. आपण सगळी माणसंच आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आपल्या मताशी न पटणारं कुणी बोललं की लग्ग्गेच आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं काढायची??? याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत.
Abdul Sattar : आधीच मंत्रिपद जाण्याच्या चर्चा, त्यात सत्तार सापडले नव्या वादात
सहज आठवलं म्हणून सांगतो.. ‘बिगबाॅस सिझन चार’ हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. त्याच टास्कमुळं कायम ओळखला जाईल. सगळ्या टास्कचा बाप – सी साॅ टास्क ! माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर – माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं. तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. नंतरच्या एका तासात बाकीचं अख्खं घर बाद झालं होतं. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं ‘सत्व’ हलवू शकत नाही.
पाटील, सावंत, सत्तार, भुमरे अन् राठोडांना डच्चू? भाजपाच्या अहवालाने खळबळ!
मला माहीतीये, सोशल मिडीयावर आपल्या विचारांशी फारकत असलेल्या कुठल्याही पोस्टवर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेन्ट करून ट्रोल करणारे फक्त आठदहा लोक असतात. त्यांची शेकडो फेक अकाऊंटस् असतात. सेलिब्रिटींना बोलताना तर यांची भाषा आणखी नीच पातळी गाठते. कारण सेलिब्रिटी “कशाला उगाच वाद” म्हणून घाबरून पोस्ट डिलीट करतात. पण यांना घाबरायचं कारण नाही. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला ‘रूतबा’ कमी होत नाही.
आपल्यावर ते गरळ ओकतात कारण आपल्याला, आपल्या शब्दांना, विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं उलट असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं… शत्रूवर नजर रोखायची…आणि गालातल्या गालात हसायचं.. ‘पठाण’ मधल्या शाहरूखसारखं. क्यों की हमारी ताकत हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलती है !