नगरमध्ये अक्षय भालेराव हत्याकांडाचे पडसाद! आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा…

नगरमध्ये अक्षय भालेराव हत्याकांडाचे पडसाद! आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा…

Akshay Bhalerao Killing Case : नांदेड जिल्ह्यातील बोंढार इथे अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली होती. सदर तरुणाची हत्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो म्हणून करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी आज (13 जून) रोजी अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे.

Cowin Data Leak : ‘कोविन अ‍ॅप डेटा लीकच्या बातम्या…’ आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी म्हणतात…

हा मोर्चा सकाळी 11 वाजता अहमदनगर महानगरपालिका येथून निघून छत्रपती संभाजीनगर रोडने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.

WTC Final :असे झाले नसते तर निकाल बदला असता, टीम इंडियाला विजेतेपद मिळाले असते, PHOTO

नेमकं प्रकरण काय ?

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची केवळ तो आंबेडकरी विचारांचा आहे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. या कारणावरून बोंढार येथील काही जातीयवादी लोकांनी त्याची निर्घृण हत्या केली.

फेक न्यूजला राज ठाकरे ही पडले बळी; देशातील आपत्कालीन सुविधांवर ठेवले बोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव याच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेकही केली.

दरम्यान, या घटनेचे पडसाद नगर जिल्ह्यात देखील उमटू लागले आहेत. या हत्याकांडातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हावी, तसेच आरोपींना कठोरातील कठोर शासन व्हावे, अशी मुख्य मागणी घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे.

यावेळी अक्षय भालेरावला न्याय मिळाला पाहिजे, अशा आशयाचे पोस्टर मोर्चामध्ये झळकवण्यात आले होते. दरम्यान, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुषांसह तरुणवर्ग सहभागी झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मयत तरुण अक्षय भालेराव याला श्रद्धांजली वाहून करीत मोर्चाची सांगता करण्यात आली. तसेच याठिकाणी नेतेमंडळींची भाषणे देखील झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube