साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या संवादाची उत्सुकता शिगेला, ‘एक दिन’ आता चित्रपटगृहांत!

Ek Din : आमिर खान प्रोडक्शनची ‘एक दिन’ ही चित्रपट अखेर चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. झलक आणि

Ek Din

Ek Din

Ek Din : आमिर खान प्रोडक्शनची ‘एक दिन’ ही चित्रपट अखेर चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. झलक आणि गाण्यांमुळे तयार झालेल्या उत्सुकतेनंतर हा चित्रपट अपेक्षांवर खरा उतरला असून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. एक अतिशय सुंदर आणि जादुई प्रेमकथा म्हणून या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सई पल्लवी आणि जुनेद खान (Junaid Khan) यांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाला आणखी उंची मिळाली आहे. आता हे दोघे एका खास आणि मनमोकळ्या संवादासाठी सज्ज झाले आहेत. सामाजिक माध्यमांवर निर्मात्यांनी या संवादाची एक झलक शेअर केली आहे, जी पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे: एक दिन, आता चित्रपटगृहांत!”

‘एक दिन’च्या (Sai Pallavi) माध्यमातून आमिर खान (Aamir Khan) आणि मन्सूर खान ही जोडी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. या जोडीने याआधी कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जाने तू… या जाने ना यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. ‘एक दिन’मुळे ही जोडी पुन्हा एकदा प्रेमकथांच्या विश्वात परतली असून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात नवीन स्टार पण अजूनही बहुमताच्या आकड्यापासून दुरुच; सत्तेसाठी मोठा निर्णय घेणार?-

या चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शन सुनिल पांडे यांनी केलं आहे. निर्मिती आमिर खान , मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. ‘एक दिन’ सध्या चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली आहे.

Exit mobile version