सईच्या पहिल्या-वहिल्या डान्स रिलचा सोशल मीडियावर धुमाकूळ!, डान्स मुव पाहून चाहत्यांकडून कौतुक

  • Written By: Published:
सईच्या पहिल्या-वहिल्या डान्स रिलचा सोशल मीडियावर धुमाकूळ!, डान्स मुव पाहून चाहत्यांकडून कौतुक

Sai Tamhankar Dance : सई ताम्हणक (Sai Tamhankar) ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. सई नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच ट्रेंडला फॉलो करत आपे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आताही सईने एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घातला आहे. (Dil mein baji guitar)

सध्या सई ताम्हणकर ही श्री देवी प्रसन्न (Shi Devi Prasanna) आणि भक्षक या दोन बड्या चित्रपटामुळं चर्चेत आली आहे. आजवर सईने अनेक भूमिका केल्या आणि त्या सुपरहिटसुद्धा झाल्या. सई एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक कमालीची डान्सर सुद्धा आहे. सईने तिचा पहिला वहिला डान्स रील आज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा डान्स रिल तिच्यासाठी खास आहे. कारण तिच्या आगामी सिनेमातील “दिल मै बजी गिटार ” या गाण्यावर सईने हा खास डान्स रील शूट केला आहे. संतोष कापडी आणि सईच्या अफलातून डान्स मुव यातून बघायला मिळतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

सई तिच्या दोन्ही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिजी असून तिने हा पहिला डान्स रिल शूट केला आहे. सईच्या डान्स मूव्ह आता पुन्हा एकदा सगळ्यांना अनुभवयाला मिळत आहेत.

दरम्यान, दिल मै बजी गिटार हे 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपना सपना मनी मनी’ या हिंदी चित्रपटातील ‘गिटार साँग’चं मराठी व्हर्जन आहे.

सई आणि सिद्धार्थ चांदेक यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ-सईसोबत जय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्य, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्या यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube