Download App

Bhakshak Teaser : 2024 मधील सई ताम्हणकरचा पहिला हिंदी चित्रपट ‘भक्षक’चा टीझर रिलीज

Bhakshak Teaser Release Out: 2024ची ओपनिंग दमदार करत सई (Sai Tamhankar ) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकायला तयार होत आहे. नेटफ्लिक्स प्रस्तुत “भक्षक” (Bhakshak Movie) या चित्रपटात सई पोलिस कॉन्स्टेबची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Hindi Movie) रेड चिली सोबतचा (Red Chilli) सईचा पहिला प्रोजेक्ट असून सई या नव्या प्रोजेक्ट बद्दल उत्सुक आहे.


नव्या वर्षातला पहिला हिंदी चित्रपट आणि तो ही नेटफ्लिक्स सोबत करताना सईसाठी हे वर्ष नक्कीच खास ठरणार आहे. भूमी पेडणेकर , संजय मिश्रा या उत्कृष्ट कलाकाराच्या सोबतीने सई भक्षकमध्ये दिसणार आहे. भक्षकचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सईला पुन्हा एकदा ओटीटीवर बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.रेड चिली सोबतचा सईचा पहिला प्रोजेक्ट असून सई या नव्या प्रोजेक्टबद्दल उत्सुक आहे.

याआधी सईने ‘हंटर’, ‘मीमी’ आणि ‘इंडिया लॉकडाऊन’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली होती. आता त्यानंतर अभिनेत्री नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला “श्री देवी प्रसन्न” (Sridevi Prasanna) हा येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Katrina Kaif: फ्लॉपनंतर कतरिना’च्या ‘या’ चित्रपटाला IMDB वर मिळाले सर्वाधिक रेटिंग

सिद्धार्थ चांदेकरचा काही दिवसांपूर्वी झिम्मा-2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता सिद्धार्थच्या “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच सई देखील विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. काही दिवसांपूर्वी तिचा मिमी हा चित्रपट रिलीज झाला होता. आता “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटात सिद्धार्थ आणि सई यांची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

follow us