Akash Thosar : वडिलांबरोबरचा ‘तो’ किस्सा सांगत आकाश ठोसर झाला भावुक

Akash Thosar : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने महाराष्ट्रभर आकाश ठोसर (Akash Thosar) प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामुळे त्याला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळाले. त्याने साकारलेलं परश्या हे पात्र आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या चित्रपट झाल्यानंतर आकाशने हिंदी वेब सीरिजमध्ये (Hindi webseries) देखील काम करण्यास सुरुवात केली. तसेच इतर काही मराठी चित्रपटही त्याने केले. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T110250.858

Akash Thosar

Akash Thosar : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने महाराष्ट्रभर आकाश ठोसर (Akash Thosar) प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामुळे त्याला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळाले. त्याने साकारलेलं परश्या हे पात्र आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या चित्रपट झाल्यानंतर आकाशने हिंदी वेब सीरिजमध्ये (Hindi webseries) देखील काम करण्यास सुरुवात केली. तसेच इतर काही मराठी चित्रपटही त्याने केले.

आता तो ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला. अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आकाश महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. यावेळी आकाशने त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली आहे. आकाशला वडील नाही, पण त्यांच्या आशिर्वादामुळे तो आजवर इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगितले आहे.


वडिलांचा उल्लेख करत आकाश म्हणाला, माझ्या वडिलांना चित्रपटांची खूप आवड होती. तू अभिनेता झालं पाहिजे असं ते मला कधीच बोलले नाही. पण मी अभिनेता व्हावं हे त्याचं बहुदा स्वप्न असावं, असे मला वाटत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. मला एक किस्सा सांगायचा आहे की, मी एकदा ट्रेनने प्रवास करत होतो. माझे वडील देखील त्याच ट्रेनने प्रवास करत होते.

Gautami Patil : कपडे बदलतांनाचा ‘त्या’ व्हिडिओवरून गौतमी पाटीलचा खुलासा

वडिल आणि मी एकाच ट्रेनमध्ये आहोत हे आम्हा दोघांना देखील माहित नव्हतं. तेव्हा ते घरी येऊन आईला सांगितले होते की, आपला मुलगा किती छान दिसत आहे. कोणीतरी याला चित्रपटांमध्ये घेतलं पाहिजे. आता माझे वडील माझ्यासोबत नाहीत. पण ही आठवण मला कायम माझ्या आईने सांगितली”. पुढे तो म्हणाला, आईने जेव्हा मला हा किस्सा सांगितला, तेव्हा मला हे ऐकून खूप भारी वाटलं. त्यांचं स्वप्न आणि वडिलांची पुण्याई आहे, ज्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगितले आहे. आकाशचं त्याच्या आई- बाबांवर खूप जीवापाड प्रेम आहे, हे त्याच्या बोलण्यामधून दिसून येत होते.

Exit mobile version