‘सैयारा’ खरं तर इंडस्ट्रीचा विजय! मोहित सूरी-वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी यांचे मत

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशकथांपैकी एक ठरलेला चित्रपट म्हणजे ‘सैयारा’.

Saiyara (1)

Saiyara (1)

Mohit Suri and YRF CEO Akshay Vidhani On Saiyaara : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशकथांपैकी एक ठरलेला चित्रपट म्हणजे ‘सैयारा’ — ज्यात दोन नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी पदार्पण केले आणि ज्याने जगभरात तब्बल ₹580 कोटीची कमाई करून बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला. मोहित सूरी दिग्दर्शित आणि वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेमकथा चित्रपट ठरला आहे. अहान आणि अनीत आता जेन जी पिढीचे आवडते स्टार्स झाले आहेत.

संपूर्ण इंडस्ट्रीचा विजय

‘सैयारा’चा (Saiyaara) प्रभाव इतका मोठा झाला की इंडस्ट्री आणि ट्रेड सर्कलने त्याची तुलना आधुनिक ‘कहो ना प्यार है’ सोबत केली — ज्या चित्रपटाने 25 वर्षांपूर्वी ऋतिक रोशन आणि अमीषा पटेल यांना रातोरात स्टार (Mohit Suri) बनवले. मोहित आणि अक्षय यांचे मत आहे की ‘सैयारा’चे यश ही केवळ चित्रपटाची नव्हे, तर संपूर्ण इंडस्ट्रीचा विजय आहे.

अक्षय विधानी म्हणतात,“‘सैयारा’ खरं म्हणजे इंडस्ट्रीसाठी (Bollywood) विजय होता. लोकांनी त्याकडे तसंच पाहिलं. आम्हाला आलेल्या असंख्य कॉल्स आणि मेसेजेसमधून आम्हाला जाणवलं की सगळ्यांना या चित्रपटाशी वैयक्तिक नातं वाटत (Entertainment) होतं. हेच सर्वात सुंदर होतं — लोक खरोखर आनंदी होते की दोन नवीन कलाकार आता या इंडस्ट्रीचा भाग झाले आहेत.”

नव्या टॅलेंटची गरज

ते पुढे म्हणतात,“आपल्याला नेहमीच नव्या टॅलेंटची गरज असते — कारण त्याने संपूर्ण इंडस्ट्रीचा विकास होतो. जितके जास्त कलाकार येतील, तितकी इंडस्ट्री बहरत जाईल. ‘सैयारा’ सारखा विजय झाला की आणि प्रेक्षकांनी जगभरातून दोन नवोदितांना स्वीकारलं की, संपूर्ण इंडस्ट्रीला वाटतं की हा त्यांचाही विजय आहे — आणि हेच ‘सैयारा’चं यश आहे.”

मोहित सूरी म्हणतात,“चित्रपटाच्या रिलीज दिवशी आम्ही स्क्रीनिंग ठेवलं होतं. अहानचं कुटुंब आणि माझं कुटुंब दोघांनीही त्या दिवशी चित्रपट पाहिला. आणि ओपनिंग डेचे आकडे यायला लागले तसे सगळीकडून येणारे प्रेम पाहून मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. मी यापूर्वी विलन च्या 16.5 कोटींसाठी जास्त आनंद केला होता, पण सैयाराच्या 23 कोटींसाठी नाही — कारण हे प्रेम मनाला नम्र करणारे होतं.”

प्रेमाचा अनुभव

ते पुढे सांगतात,“रिलीज नंतर दर संध्याकाळी जगभरातून कॉल्स येत होते — स्पर्धक, दिग्दर्शक, प्रोड्यूसर्स, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता तेही. सगळ्यांनी म्हटलं की हा त्यांचाही विजय आहे. माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मी अशा प्रेमाचा अनुभव कधीच घेतला नव्हता. आम्ही हा चित्रपट पूर्ण प्रामाणिकपणे आणि साधेपणाने बनवला आणि प्रमोट केला — आणि म्हणूनच तो लोकांच्या मनात घर करून गेला.”

Exit mobile version