Saiyara Movie Album : प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या सैयारा (Saiyara) या प्रेमकथानक चित्रपटामुळे यशराज फिल्म्स (Yash Raj Films) आणि मोहित सूरी (Mohit Suri) हे दोघं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत जे आपल्या काळातील सदाबहार प्रेमकथांचा आत्मा जपणारे आहेत. सैयारा आजच्या पिढीतील सर्वाधिक अपेक्षित प्रेम कथांमध्ये गणली जाते. या चित्रपटाच्या संगीत अल्बमने वर्षातील सर्वोत्तम अल्बमचा दर्जा मिळवला आहे. फहीम-अर्सलान यांचं शीर्षकगीत सैयारा (Saiyara), जुबिन नौटियालचं बर्बाद, विशाल मिश्राचं तुम हो तो, सचेत-परंपराचं हमसफर आणि आता अरिजीत सिंह व मिथून यांचं धुनहे सर्वच गाणं संगीत चार्ट्सवर धुमाकूळ घालत आहेत.
मोहित सूरी सांगतो की, “सैयारामध्ये देशातील सर्वोत्तम संगीत प्रतिभा एकत्र आल्या आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे.” तो पुढे सांगतो की सैयारा चा संगीत अल्बम हे त्यांच्या लाडक्या पहिल्या आशिकी चित्रपटाला दिलेले एक भावनिक ट्रिब्यूट आहे. महेश भट्ट दिग्दर्शित आणि राहुल रॉय व अनु अग्रवाल अभिनीत आशिकी चित्रपटाने आपल्या संगीतामुळे संपूर्ण देशाला वेड लावले होते.
20 वर्षांच्या यशस्वी सिनेकारकिर्दीत अनेक हिट प्रेमकथा दिलेल्या मोहित सूरी म्हणतो “सैयारा अल्बम ही माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय रोमँटिक अल्बम्सना दिलेले ट्रिब्यूट आहे, आणि विशेषतः पहिल्या आशिकी चित्रपटाला, ज्याच्या संगीतात मी मंत्रमुग्ध झालो होतो. तेव्हा मला समजलेच नाही की हे माझ्यावर काय झालं पण मी संगीतावर प्रेम करू लागलो आणि ती प्रेमकथा अजूनही माझ्या प्रत्येक चित्रपटातून सुरू आहे.”
मोहित सूरी आनंदी आहेत की सैयाराचा अल्बम लोकांच्या यशराजसोबतच्या त्यांच्या सहयोगाबाबत असलेल्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. वायआरएफ च्या 50 वर्षांच्या इतिहासात यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी दिलेल्या प्रेमकथांना देशात एक वेगळा स्थान आहे. आता मोहित सूरीसोबत ते एक तरुण आणि तीव्र प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आणत आहेत ज्या बॉक्स ऑफिसवर रोमँटिक शैलीला पुन्हा जिवंत करू शकते, असं ट्रेड पंडित मानतात.
मोहित म्हणतो “देशातील सर्वोत्तम संगीतकार एकत्र येऊन एक अल्बम तयार करतात, हे फार दुर्मिळ असतं. सैयारा मध्ये ते शक्य झालं आणि हे अल्बम काळाच्या कसोटीवर टिकेल, अशी मला आशा आहे. लोक एक सुंदर प्रेमकथा पाहण्यास उत्सुक आहेत आणि माझी आशा आहे की सैयारा त्यांचं संपूर्ण मनोरंजन करेल. संगीत हे प्रेक्षकांना थिएटरकडे खेचणं हे मोठं काम करतं आणि मला वाटतं आम्ही ते काम पूर्ण केलं आहे.”
तो पुढे म्हणतो “दुनियेत सर्वाधिक फॉलोअर्स असणारा गायक अरिजीत सिंह, मिथून, तनिष्क बागची, जुबिन नौटियाल, विशाल मिश्रा, सचेत-परंपरा, काश्मीरचे फहीम-अर्सलान आणि गीतांचे जादूगार इरशाद कामिल — या सर्वांचं एकत्र येणं हीच ड्रीम टीम आहे. प्रेक्षकांनी अल्बमवर दिलेल्या प्रतिक्रियांवरून सर्व काही स्पष्ट होतं. मी खूप खुश आहे की हे सगळं सैयारा मध्ये शक्य झालं.” वायआरएफ च्या सैयारा या चित्रपटाला आतापर्यंत प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. नवोदित कलाकारांची केमिस्ट्री आणि अभिनय कौशल्य सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत.
या चित्रपटातून वायआरएफ चा नवा हिरो आहान पांडे पदार्पण करत आहे. स्टुडिओने अनीत पड्डा हिला पुढची वायआरएफ हिरोईन म्हणून निवडलं आहे. जिने ‘बिग गर्ल्स डोंट क्राई ’ या चर्चित सीरीज मध्ये तिच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते.
पुण्यात शिकणाऱ्या गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती
मोहित शेवटी म्हणतो “माझी आशा आहे की प्रेक्षक सैयारा ला असेच प्रेम देतील आणि हे गाणे प्रत्येक त्या व्यक्तीला भिडतील जो प्रेमावर विश्वास ठेवतो.” सैयारा चे निर्माते वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी आहेत आणि हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.