‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 9 दिवसांत कमावले तब्बल 220 कोटी

‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 9 दिवसांत कमावले तब्बल 220 कोटी

Saiyaara Movie Collection : यशराज फिल्म्स (YRF) आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला (Entertainment News) आहे. अवघ्या 9 दिवसांत 220.75 कोटींची कमाई करत ‘सैयारा’ने एक ऐतिहासिक (Mohit Suri) यश मिळवले आहे.

या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अहान पांडे आणि अनित पद्ढा हे नवोदित कलाकार अल्पावधीतच झपाट्याने लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या सादरीकरणाने विशेषतः जेन Z प्रेक्षकवर्गाला भुरळ घातली असून सोशल मीडियावर दोघांचं नाव गाजतंय.’सैयारा’च्या यशात आणखी एक खास बाब म्हणजे, रोमँटिक चित्रपटासाठी आतापर्यंतच्या सर्वाधिक ओपनिंग वीकेंडचा विक्रम या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ चालला नाही, तर ट्रेंडही तयार करत आहे.

गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन पाचपुते कुटुंबाशी! राहुल जगतापांचा आमदार पाचपुतेंवर निशाणा

सामान्यतः दुसऱ्या आठवड्यात चित्रपटांच्या शोची संख्या कमी होत जाते, मात्र ‘सैयारा’ याला अपवाद ठरतोय. पहिल्या आठवड्यात 2225 स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता 3800 स्क्रीनवर दाखवण्यात येत आहे, जे चित्रपटाच्या वाढत्या मागणीचं द्योतक आहे.

दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला देखील ‘सैयारा’ने दमदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी ₹1850.५० कोटी, शनिवारी ₹27 कोटी, अशा एकूण ₹45.50 कोटींची कमाई दुसऱ्या आठवड्याच्या केवळ दोन दिवसांत झाली आहे.

राही बर्वेच्या आत्मचरित्राचा गौरव! बहिण फुलवाची पोस्ट नेटिझन्सच्या मनाला भिडली

YRF चे सीईओ अक्षय विधानी यांच्या निर्मितीत तयार झालेला आणि मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. समीक्षकांकडून मिळालेली सकारात्मक दाद, प्रेक्षकांची उस्फूर्त प्रतिक्रिया आणि अफाट कमाई – यामुळे ‘सैयारा’ वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरतोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube