‘सैयारा’च्या ‘धुन’ गाणं विशेष, जेव्हा मी, मिथून आणि अरिजित एकत्र येतो तेव्हा…, मोहित सूरी असं का? म्हणाले

‘सैयारा’च्या ‘धुन’ गाणं विशेष, जेव्हा मी, मिथून आणि अरिजित एकत्र येतो तेव्हा…,  मोहित सूरी असं का? म्हणाले

Arijit Singh : संगीत क्षेत्रातील स्वप्नवत त्रिकुट अरिजित सिंग (Arijit Singh) , मिथून (Mithun) आणि मोहित सूरी (Mohit Suri) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सैयारा चित्रपटाच्या पुढील गाण्यासाठी धुन, जे उद्या प्रदर्शित होणार आहे. या तिघांनी ‘आशिकी 2’ मधील ‘तुम ही हो’सारखी अनेक ऐतिहासिक हिट गाणी दिली आहेत आणि मोहित सूरी यांना आनंद आहे की जेव्हा हे तिघं एकत्र येतात, तेव्हा चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात.

मोहित सूरी म्हणतो , “म्हणतात ना, जेव्हा तारे एकत्र येतात, तेव्हा जादू होते. माझ्या आयुष्यात आधी मिथून आणि मग अरिजित आला , याचं श्रेय मी तारकांना देईन, कारण मला देशातील या दुर्मिळ कलाकारांबरोबर माझं सर्वोत्तम संगीत बनवायला मिळालं आहे.” मिथूनसोबतच्या २० वर्षांच्या सहकार्याविषयी मोहित म्हणतो , “माझं आणि मिथूनचं सहकार्य 2005 पासून सुरू आहे ‘झहर’ आणि ‘कलयुग’ पासून. ‘मर्डर 2’, ‘आशिकी 2’, ‘एक विलन’, ‘हमारी अधूरी कहानी’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘मलंग’ आणि आता ‘सैयारा’ आम्ही एकत्र खूप रोमँटिक गाणी बनवली आहेत आणि त्याचा खूप अभिमान वाटतो.”

तो पुढे म्हणतो, “जेव्हा आम्ही दोघं एकत्र येतो, तेव्हा लोकांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आणखी मेहनत घेतो. त्याचं दडपण आम्हाला प्रेरणा देतो.”

अरिजित सिंगसोबतच्या आठवणींविषयी मोहित म्हणतो , “अरिजित हा असा गायक आहे ज्याने मला आयुष्यभर पुरणाऱ्या आठवणी दिल्या आहेत ‘तुम ही हो’, ‘चाहूं मैं या ना’, ‘हम मर जाएंगे’, ‘हमदर्द’, ‘हमारी अधूरी कहानी’, ‘फिर भी तुमको चाहूंगा’, ‘चल घर चलें’ ही फक्त गाणी नाहीत, ती माझ्या मनाचे तुकडे आहेत.” मोहित स्पष्ट करतो , “जेव्हा आम्ही तिघं मी, मिथून आणि अरिजित एकत्र येतो, तेव्हा लोक आमच्याकडून एक अमर्याद गाण्याची अपेक्षा करतात आणि आम्हाला ती अपेक्षा खूप प्रिय आहे. धुन हे गाणं आमच्यासाठी विशेष आहे.”

गाण्याविषयी मोहित म्हणतो , “‘धुन’ हे गाणं प्रेमात आणि आयुष्यातील संघर्षाचं उत्सव आहे. संघर्षातून प्रेरणा घेत जगण्याचं गाणं आहे. जीवन सोपं नसतं, लोक खूप काही सहन करतात आणि धुन त्याच न झुकणाऱ्या आत्म्याचं प्रतीक आहे.” ‘सैयारा’, मध्ये आहान पांडे आणि अनीत पड्डा हे पदार्पण करत आहेत, हे यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांचं एकत्रित प्रेमकथेचं चित्रपट आहे, ज्याला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

भाजपला धक्का, आमदार टी राजा यांनी दिला राजीनामा

या चित्रपटाच्या अल्बममधील चारही गाणी सैयारा,बर्बाद , तुम हो तो, आणि हमसफर संगीत चार्टवर गाजत आहेत. चित्रपटाचं नाव ‘सैयारा’ याचा अर्थ आहे एक भटकतं आकाशीय तारा, जे कायम चमकतं, दिशा दाखवतं पण नेहमीच थोडं दूर असतं एक सुंदर आणि अलौकिक प्रतीक. सैयारा 18 जुलै 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube