Sonu Sood: सोनू सूदने ‘या’ कारणांसाठी अरिजित सिंगचे मानले आभार; म्हणाला, ‘जादुई आवाज…’

Sonu Sood: सोनू सूदने ‘या’ कारणांसाठी अरिजित सिंगचे मानले आभार; म्हणाला, ‘जादुई आवाज…’

Sonu Sood Arijit Singh: बॉलिवूडसह (Bollywood) साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद (Sonu Sood). उत्तम अभिनयामुळे जोरदार चर्चेत येणारा सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून त्याच्या जनसेवेसाठी ओळखला जात आहे. (Fateh Movie) सोनू सूद पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनू सूद लवकरच ‘फतेह’ (Fateh Film) सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच सोनू सूदने चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर रीलिज केलं होत.

यासोबतच चित्रपटाची उत्सुक असताना आता सिनेमाविषयी आणखी एक खास गोष्ट समोर आली आहे. सोनू सूदने त्याचा सोशल मीडियावरून (social media) चाहत्यांना चित्रपटाबद्दल अजून एक अपडेट दिला आहे. “फतेह”साठी “जादुई आवाज” दिल्याबद्दल त्यांनी अरिजित सिंगचे (Arijit Singh) आभार मानले आहे . यातून आता असे स्पष्ट होतंय की अरिजित सिंगच्या जादुई गाण्याची झलक ‘फतेह’ सिनेमात ऐकायला मिळणार आहे.

अभिनेत्याने गायकाचा फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की, फतेहसाठी तुमचा जादुई आवाज दिल्याबद्दल धन्यवाद @arijitsingh” अशी पोस्ट अभिनेत्याने यावेळी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘फतेह’ सिनेमाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले आहे. ज्यांनी याअगोदर ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘शमशेरा’ सारख्या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

Jyotika: अभिनेत्री नाकारला होता राजकुमारचा चित्रपट’, पण पतीच्या सांगण्यावरुन बदलला निर्णय

या सिनेमात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटात ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. हॉलिवूड स्टंट स्पेशालिस्ट ली व्हिटेकर यांच्या देखरेखीखाली ॲक्शन सीन्स करण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube