Saiyaara Movie : सैयारा 500 कोटींचा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला असून वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी म्हणाले की “प्रत्येक प्रेक्षकाचे आभार, ज्यांनी सैयारा ला आपल्या काळाची सर्वोच्च प्रेमकहाणी बनवले. ”
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक गल्ला जमवणारी प्रेमकथा सैयारा , ही एक पदार्पण करणारी फिल्म असूनही जगभरात 500 कोटींचा गल्ला गाठून इतिहास रचत आहे. वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी यांनी निर्मित केलेला हा चित्रपट , नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा सर्वात मोठा डेब्यू ठरला आहे. या चित्रपटाने दोघांनाही जेन जी चे स्टार्स आणि देशाचे लाडके बनवले आहे.
दिग्दर्शक मोहित सूरी यांच्यासाठीही सैयारा पहिला 500 कोटींचा वर्ल्डवाइड गल्ला कमावणारी चित्रपट ठरला आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे, की नवोदित जोडीच्या चित्रपटाने 500 कोटींचा क्लब पार केला आहे. अवघ्या 18 दिवसांत हे चित्रपटाने 507 कोटीचा आकडा पार केला आहे!
सीईओ अक्षय विधानी म्हणाले “एक कंपनी म्हणून, सैयारा च्या या ऐतिहासिक यशाचा मान आम्ही मोहित सूरी यांना देतो, ज्यांनी या पिढीला आपली म्हणावी अशी प्रेमकहाणी दिली. आमचे नवोदित कलाकार अहान आणि अनीत, ज्यांनी प्रेक्षकांना खरं प्रेम अनुभवायला लावलं, आदित्य चोप्रा यांचे मार्गदर्शन, आणि वायआरएफ च्या संपूर्ण टीमचे आभार – त्यांनी हा चित्रपट एक जागतिक फेनोमेनन बनवला.”
ते पुढे म्हणाले की, “सैयारा चे यश हे दाखवते की जर योग्य प्रेमकथा दिली, तर रोमँटिक शैलीला प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रेम मिळू शकते. हे यश आम्हाला आणखी उत्तम आणि प्रेरणादायी कहाण्यांचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतं.”
अक्षय पुढे म्हणाले की, “तरुण प्रेक्षकांनी हे चित्रपट उचलून धरले हे पाहून अत्यंत समाधान होतंय. प्रत्येक प्रेक्षकाचे आभार, ज्यांनी सैयारा ला आपल्या काळातील परिभाषित प्रेमकथा बनवलं.”
सैयारा – वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस (तिसऱ्या आठवड्यात):
भारत (GBOC): ₹376 कोटी
विदेशात (GBOC): ₹131 कोटी
एकूण वर्ल्डवाइड GBOC: ₹507 कोटी / $58.28 मिलियन (4 ऑगस्ट 2025 पर्यंत)
भारत – तिसऱ्या आठवड्याचे NBOC आकडे:
शुक्रवार – ₹5.00 कोटी
शनिवार – ₹7.00 कोटी
रविवार – ₹8.25 कोटी
सोमवार – ₹2.50 कोटी
तिसरा आठवडा – ₹22.75 कोटी
नेट एकूण भारतात – ₹308.00 कोटी
मोठी बातमी, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ