Download App

Sajid Nadiyadwala : सर्वच जॉनर चित्रपटांची मुशाफिरी करणारे दुरदर्शी निर्माते….

Sajid Nadiyadwala : हिंदी चित्रपटातील कमी जास्त प्रमाणात सर्वच जॉनरचे चित्रपट निर्माण करणारे चित्रपट निर्माते म्हणजे साजिद नाडियाडवाला यांचं नाव घेतलं जात. त्यांनी त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या नाडियाडवाला ग्रॅन्डसन एन्टरटेन्मेंटने प्रेक्षकांना दमदार कथा दाखवल्या, भरपूर मनेरंजव केलं. अनेक चित्रपटांतून त्यांनी एक ट्रेन्ड सेट केला आहे. त्यांनी भारतीय चित्रपटांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. (Sajid Nadiyadwala makes Films of Every jonner like comedy action romantic inspirational )

‘ही कसली मुलाखत ही तर जळजळ, मळमळ अन् अपचनाचे करपट ढेकर’; शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

कसा आहे निर्माते साजिद नाडियाडवालांचा प्रवास?

एक चित्रपट निर्माते म्हणून साजिद नाडियाडवाला यांचा प्रवास अत्यंत प्रेरक आणि मनोरंजक आहे. ते भारतातील कुशल निर्माते आहेत. नुकतचं त्यांचा जगातील 200 देशांमध्ये ओटीटीवर बवाल हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आतापर्यंतच्या विविध जॉनरच्या चित्रपटांवर नजर टाकुयात…

Jaya Bachchan पुन्हा मीडियावर वैतागल्या! म्हणाल्या, ‘मी बहिरी नाही, ओरडू नका…’

1 स्वतःचा शोध घेणारे चित्रपट :
साजिद नाडियाडवाला यांचे हायवे आणि तमाशा हे दोन चित्रपट अत्यंत खास आहेत. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला हायवे एका युवतीचा प्रवास आहे. जीचं अपहरण झाल्यानंतर ती स्वतःला शोधते. तर तमाशामध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यात स्वतःचा तसेच सोबतच्या व्यक्तीच्या स्वप्नाचा शोध घेतला जात आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये वेगळे विषय होते.

2 रोमॅंटीक :
2014 ला आलेला चेतन बागत यांच्या कादंबरीवर आधारित 2 स्टेट्समध्ये अर्जुन कपूर आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका होत्या त्यात त्यांनी दोन राज्यांतील सांस्कृतिक फरक देखील प्रेमाच्या आड येत नाही. हे दाखवण्यात आलं आहे.

3 प्रेरणादायी :
सुपर 30 मध्ये ऋतिक रोशनने मॅथेमॅटेशियन आनंद कुमारची भूमिका साकारली होती. त्यात मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी तयार केलं जात. तर 83 या चित्रपटात भारताने 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावर आधारित तसेच कॅप्टन कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

4 कॉमेडी :
साजिद नाडियाडवाला यांचे हाऊसफुलच्या फ्रॅंन्चाईजी लोकांनी खुप डोक्यावर घेतलं. त्यानंतर वरूण धवण, तापसी पन्नु आणि जॅकलिन फर्नांडीस यांचा जुडवा 2 या कॉमेडी चित्रपटाने लोकांना खळखळू हसवले.

5 अॅक्शन :
अॅक्शनमध्ये देखील नाडियाडवाला यांनी आपले कौशल्य आजमावले आहेत. त्यात टायगर श्रॉफ स्टारर बागी 1 आणि 2 सलमान कानचा किक यासारख्या अॅक्शन चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

Tags

follow us