रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा.

Untitled Design (9)

Untitled Design (9)

‘Salbardi’ is coming to the audience! : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.

‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे. ‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मराठवाड्याला पावसाने झोडपलं; आंबा उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Exit mobile version