Download App

Tiger 3: ‘या’ अभिनेत्यांनी प्रेक्षकांना YRFच्या स्पॉयलर उघड न करण्याचे केले आवाहन

YRF Tiger 3: सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3च्या (Tiger 3 Movie) कथानकामधील अगणित रहस्यांचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.


सलमानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही #Tiger3 खूप मेहनतीने बनवला आहे आणि जेव्हा तुम्ही चित्रपट पाहणार आहात, त्यावेळेस मात्र आमच्या चित्रपटामधील स्पॉइलरच संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत आहोत. स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. जे योग्य आहे ते तुम्ही कराल यावर आमचा विश्वास आहे. आम्‍हाला आशा आहे की #Tiger3 ही आमच्‍याकडून तुम्‍हाला दिवाळीमध्ये मनोरंजन करणार आहे.

कतरिनाने तिच्या सोशल मीडियावर लिहिले की, “#Tiger3 मधील कथानकाचे ट्विस्ट आणि सरप्राईज चित्रपटाच्या चित्रपट पाहण्याच्या अनुभवात भर घालतात! म्हणून, आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणतेही स्पॉयलर उघड करू नका. आमच्या प्रेमाचे आणि मेहनतीचे रक्षण करण्याची शक्ती तुमच्या हातात आहे जेणेकरून ते चाहत्यांना सर्वोत्तम मनोरंजन देऊ शकेल. धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा!”

PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन

इमरानने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, “#Tiger3 सारख्या चित्रपटात असंख्य रहस्ये आहेत आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो! कृपया कोणतेही स्पॉयलर उघड करू नका कारण त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याच्या अनुभवाला बाधा येईल. #Tiger3 बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही आम्हाला पूर्ण पाठिंबा द्याल! दिवाळीच्या शुभेच्छा!”

आदित्य चोप्रा निर्मित, आणि मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 या रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठान नंतरचा हा YRF स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे, जो भारतातील सर्वात मोठा सिनेमा आयपी आहे. YRF च्या स्पाई यूनिवर्स मधील सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

follow us

वेब स्टोरीज