Download App

Tiger 3: भाईजान अन् कतरिनाचा जलवा; टायगर 3 मधील गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती

Tiger 3 Leke Prabhu Ka Naam song: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या कतरिना (Katrina Kaif) आणि भाईजानचा सिनेमातील “लेके प्रभु का नाम” हा धमाकेदार गाणं प्रदर्शित करण्यात आला आहे. गाणं रिलीज झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. काही तासांतच गाणं तुफान व्हायरल झाला आहे.

‘लेके प्रभू का नाम’ हे ‘टायगर ३’मधील पहिले गाणे 23 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकताच गाणं प्रदर्शित झाला असून सलमानचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत. या गाण्यात नेहमीप्रमाणेच सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली आहेत. ‘टायगर 3’ या सिनेमाला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे. तर सिनेमातील हे पहिलं गाणं अरिजित सिंहने गायलं आहे. तब्बल 10 वर्षांनी एकमेकांमधले वाद बाजूला ठेवून सर्वप्रथम अरिजितने सलमान म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजानसाठी आवाज दिला आहे. एका पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान काही गोष्टींवरुन अरिजीत व सलमानमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सलमानने आपल्या चित्रपटातून अरिजीतला काढलं देखील होतं.

भाईजान या सिनेमातील ट्रेलरमध्ये काही स्टंट करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. तसेच कतरिनाचे देखील काही अॅक्शन सीन्स ‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ‘टायगर 3 या सिनेमाचा हा २ मिनिटे ५१ सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यंदा ‘भाईजान हा दिवाळीला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार’, असा अंदाज चाहते लावत आहेत.

Katrina Kaif: कतरिना कैफ ठरली प्रसिद्ध वॉच ब्रँड ‘राडोची’ ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

या सिनेमात भाईजान सोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर ‘टायगर 3’ हा सिनेमा यंदा दिवाळीमध्ये 12 नोव्हेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

 

Tags

follow us