Download App

दहावीपर्यंत शिक्षण, अन्… ; सलमानच्या घराखाली फायरिंग करणारा कालू कोण? मोठी माहिती समोर..

Salman Khan Firing New Update: बॉलिवूडचा (Bollywood) दबंग अभिनेता म्हणजेच सलमान खानला (Salman Khan) चाहत्यांची कमी नाही. सुपरस्टारचा दबदबा सर्वत्र दिसत आहे. मात्र गेल्या काही काळापासून सलमान जुन्या वादामुळे चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. त्याला वारंवार धमक्या येत होते. तर आता घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ( Galaxy apartment ) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याच्याबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणारा कालू कोण?

बॉलिवूड सुपरस्टारच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव विशाल राहुल आहे. त्याला कालू असेही म्हणतात. विशाल हा गुरुग्रामचा रहिवासी असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. कालूचाही गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असून त्याच्यावर 5 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. देशाची राजधानी दिल्लीतही एक गुन्हा दाखल आहे. कालूवर गोळीबार आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. कालूवर गुरुग्राममध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालूच्या नुकत्याच झालेल्या गुन्ह्याबद्दल सांगायचे तर, लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार त्याने हरियाणातील रोहतक येथे एका व्यावसायिकाची हत्या केली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्येही रेकॉर्ड झाली असून गोळी झाडताना काळूची ओळख पटली. याशिवाय कालूवर हरियाणातील एका भागात दरोड्याचाही आरोप आहे.

Rajkummar Rao: …म्हणून बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार, अभिनेत्याची घोडदौड सुरुच

या प्रकरणाचे अपडेट काय आहे?

या प्रकरणातील अपडेटबद्दल बोलताना सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: सलमान खानशी फोनवर बोलले आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तीही सलमान खानला भेटायला आल्या आहेत. काल संध्याकाळी अनेक चाहते सलमान खानला पाठिंबा देण्यासाठी आले होते. या प्रकरणी सुपरस्टारच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सलमानचे वडील सलीम खान यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

follow us