Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) बुधवारी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) पोहोचला होता. दुबईत ईद (Eid) साजरी केल्यावर तो मुंबईमध्ये परतला होता. यावेळी एअरपोर्टवर भाईजानची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
यामध्ये भाईजानच्या आजूबाजूला चाहत्यांचा मोठा गराडा बघायला मिळत आहे. गर्दीत अनेक चाहते भाईजानशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत नकार दिल्यानंतर देखील एक चाहता भाईजानसमोर हात पुढे करत असल्याचे दिसून येत आहे, तेव्हा त्याच्या बाजूला असलेला बॉडीगार्ड शेरा त्या चाहत्याला जोरदार धक्का दिले असलयाचे दिसून येत आहे.
शेरा आणि भाईजानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनकडून अनेक प्रकारची प्रतिक्रिया येत आहेत. ‘गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची भीती असेल’ असं एकाने लिहिले आहे तर‘ अशा लोकांना इतका भाव का देता’, असा प्रश्न दुसऱ्या युजरने केला आहे.
चाहत्याला दिलेली ही किती वाईट वागणूक आहे, असंही एका यूजरने म्हटले आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर भाईजानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भाईजानला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने बुलेटप्रूफ कारसुद्धा खरेदी केली आहे. शेरा हा भाईजानचा अत्यंत जवळचा बॉडीगार्ड आहे.
Janhvi Kapoor: इव्हेंटमधील ‘त्या’ ड्रेसमुळे जान्हवी कपूरला चाहत्यांनी सुनावलं, “म्हणाले…”
तो स्वत: कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. भाईजान आणि शेराची पहिली भेट ही गायक व्हिगफिल्डच्या शोमध्ये झाली होती. त्यानंतर १९९५ मध्ये भाईजान केनू रिव्ह्सच्या पार्टीमध्ये पुन्हा एकदा शेराला भेटला होता. तिथे सोहैल खानने शेराला भाईजानचा बॉडीगार्ड होण्याची मागणी केली होती. १९९८ मध्ये शेराने भाईजानच्या चंदीगडमधल्या शोसाठी पहिल्यांदा बॉडीगार्ड म्हणून काम केलं होतं.
तेव्हापासून तो भाईजानच्या सेवेत कायम रूजू आहे. एका मुलाखतीत शेरा म्हणाला होता की भाईजान त्याच्यासाठी सर्वकाही आहे. मी त्यांच्यासाठी माझा जीवसुद्धा देऊ शकतो. तो माझा देव आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाईजान सोबत राहीन, असं तो म्हणाला होता. भाईजान शेराचा मुलगा अभीरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.