Download App

Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

Salman Khan House Firing 3 Arrested Crime Branch investigate : बॉलीवूडचा ( Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या ( Salman Khan ) घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ( Galaxy apartment ) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

बळाचा वापर केल्याने युनोचा इस्त्रायलला इशारा तर अमेरिकेकडून इराणवरही कारवाईची मागणी

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर या गोळीबाराचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांकडून तपासाचे सूत्र क्राईम ब्रँचकडे देण्यात आले आहेत. तर क्राईम ब्रांचचे युनिट नाईन हा तपास करणार आहे.

राज्यावर अवकाळीचं संकट कायम; आजही काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट!

दरम्यान गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याने गोळीबार केल्याचा दावा एका फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेत राहणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ओम ओम जय श्री राम, जय गुरुजी जांभेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला गेला तर युद्ध योग्य आहे. सलमान खान, आम्ही तुम्हाला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे, जेणेकरून तुम्हाला आमची ताकद समजेल. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे, त्यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. मला जास्त बोलायची सवय नाही. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गोल्डी ब्रार ग्रुप, कला जथेडी ग्रुप, रोहित गोदरा ग्रुप. असं या व्हायरल पोस्टमध्ये लिहिण्यात आला आहे.

follow us