Salman Khan: टायगर जख्मी हैं! भाईजानचा शुटींग दरम्यान अपघात

Salman Khan: बॉलिवूडचा सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान (Bhaijaan) सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसीकी जान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यानंतर तो ‘टायगर 3’ (Tiger 3) या बहुचर्चित आगामी चित्रपटासाठी शुटींगमध्ये खूपच बिझी आहे. (Salman Khan accident) दरम्यान टायगर 3च्या शुटींगच्या दरम्यान भाईजानचा अपघात झाला असून भाईजान […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T223423.058

Salman Khan

Salman Khan: बॉलिवूडचा सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान (Bhaijaan) सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसीकी जान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यानंतर तो ‘टायगर 3’ (Tiger 3) या बहुचर्चित आगामी चित्रपटासाठी शुटींगमध्ये खूपच बिझी आहे. (Salman Khan accident) दरम्यान टायगर 3च्या शुटींगच्या दरम्यान भाईजानचा अपघात झाला असून भाईजान हा गंभीर जखमी झाला आहे.


भाईजानच्या सेटवरील एक फोटो समोर आला आहे. भाईजान स्वत: फोटो शेअर (Photo Share ) करत ही माहिती दिली आहे. त्याच्या डाव्या हाताच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्यानं खांद्याला पट्टी लावली असल्याचे दिसून येत आहे. भाईजानच्या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. सध्या भाईजानचा फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भाईजानला दुखापत झालेला फोटो शेअर करत त्याने एक पोस्ट लिहिली आहे. त्याने सांगितले आहे की, “तुम्हाला वाटतं तुम्ही संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर उचलताय. पण जगाचं सोडा ५ किलोचा डम्बेल उचलून दाखवा”. या पोस्टसह भाईजान “टायगर जख्मी हैं” असा हॅशटॅगही त्याने यावेळी शेअर केला आहे. भाईजानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो टायगर 3च्या सेटवर आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

अभिनेता पाठमोरा उभा असून त्याच्या डाव्या खांद्याला पट्ट्या लावल्याचे दिसून येत आहे. खांद्याला नेमकी कोणत्या प्रकारची दुखापती झाली आहे, हे काही कळू शकले नाही. पण भाईजानने शेअर केलेल्या पोस्टवरून असा अंदाज लावण्यात येत आहे की, भाईजान जीम करत असताना त्याला ही गंभीर दुखापत झाली असावी. 5 किलोचे डम्बेल्स उचलताना त्याच्या खांद्यावर दुखापत झाल्याचे त्याने यावेलोई सांगितले आहे. पण दुखापती नेमकं कारण काय? याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागले आहे.

‘टायगर 3’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्सची पाचवी फिल्म आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ च्या यशानंतर आता टायगर 3 हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात भाईजानसह अभिनेत्री कतरिना कैफ प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. 2023च्या दिवाळीत टायगर 3 चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version