Download App

Salman Khan: ‘…कोण आहे ती महिला? नेटकऱ्यांनी भाईजानला विचारला प्रश्न

  • Written By: Last Updated:

Salman Khan Condolence To Addu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान म्हणजेच भाईजान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सतत त्याला मिळणाऱ्या धमक्यामुळे जोरदार चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह राहत असतो. भाईजान हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची सतत चाहत्यांना माहिती देत असतो.


सध्या भाईजान हा त्याच्या एका पोस्टमुळे जोरदार चर्चेत आहे. भाईजानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एका महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे. भाईजान ज्या महिलेला श्रद्धांजली वाहिली, ती नेमकी कोण आहे? असा सवाल सध्या चाहते भाईजानला विचारत आहेत.

भाईजानची पोस्ट

भाईजान त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक महिला दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिले आहे की, ‘माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना तू मला खूपसार दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी तुझे आभार मानतो.अद्दू… तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

भाईजानने शेअर केलेल्या या पोस्टला चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करुन अनेकांनी ही महिला कोण?’ असा सवाल विचारला आहे. भाईजानने शेअर केलेल्या फोटोमधील महिला ही भाईजानची केअर टेकर होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण या महिलेबद्दल भाईजानने आणखी कोणतीही माहिती दिली नाही.

Tags

follow us