‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

The Kerala Story Controversy : गेल्या काही दिवसांपासून ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी आणि काँग्रेसने या चित्रपटावर द्वेष पसरवणे आणि प्रोपेगेंडा असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मंगळवारी, न्यायमूर्ती केएस जोसेफ आणि बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाकडून अधिवक्ता निजाम पाशा आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यांनी खंडपीठाला सांगितले की हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत 16 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. निजाम पाशा कोर्टात म्हणाले, हा चित्रपट द्वेषपूर्ण भाषणाचे सर्वात वाईट आणि सर्वात खालच्या दर्जाचे उदाहरण आहे. हा चित्रपट केवळ प्रोपेगेंडा करत आहे.

Delhi Crime : टिल्लू ताजपुरियाची तिहार जेलमध्ये हत्या…

यावर उत्तर देताना न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले की द्वेषयुक्त भाषणाचे अनेक प्रकार आहेत. असे नाही की कोणीतरी अचानक व्यासपीठावर जाऊन द्वेषयुक्त भाषण करत आहे. चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. आम्ही या चित्रपटावर कोणताही टॅग लावू शकत नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर योग्य व्यासपीठावरुन प्रयत्न करावेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube