Delhi Crime : टिल्लू ताजपुरियाची तिहार जेलमध्ये हत्या…

Delhi Crime : टिल्लू ताजपुरियाची तिहार जेलमध्ये हत्या…

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये गँगस्टर सुनील मान उर्फ ​​टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आली आहे. टिल्लू ताजपुरियावर रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगीचा खून केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेले योगेश टुंडा आणि त्याचा साथीदार दीपक तीतर यांनी टिल्लूवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता टिल्लू ताजपुरियाचा मृत्यू झाला आहे.

पवारांच्या घोषनेनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात एकांतात नेमकी चर्चा काय?

मात्र, सध्या तिहार तुरुंग प्रशासन हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगत असून या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. टिल्लू ताजपुरिया कुख्यात बदमाश नवीन बाली, कौशल आणि गुंड नीरज बवानिया यांच्यासोबत तिहार तुरुंगातून टोळी चालवत होता.

रोहिणी कोर्ट गोळीबारात त्याचे नाव पुढे आले. सप्टेंबर २०२१ मध्ये, रोहिणी कोर्टात वकिलांच्या वेशात आलेल्या दोन हल्लेखोरांनी न्यायाधीशांसमोर गुंड जितेंद्र गोगीवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात गोगीचा जागीच मृत्यू झाला.

कसोटी क्रमवारीत भारताचा दबदबा; पाहा कोण कितव्या स्थानावर

मात्र, पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत दोघेही गोळीबारात ठार झाले. टिल्लू ताजपुरिया तेव्हा मंडोली तुरुंगात बंद होता आणि त्याचे गोगी टोळीशी वैर होते आणि त्याचे नाव या गोळीबाराशी जोडले गेले होते.

टिल्लूच्या हत्येमागे गोगी टोळीचा हात असू शकतो, असे मानले जात आहे. टिल्लू आणि गोगी टोळीचे वैर फार जुने आहे. पण एकेकाळी टिल्लू आणि गोगी यांची मैत्री होती. त्यानंतर टोळीयुद्धात अनेकांना जीव गमवावा लागला.

टिल्लू हा ताजपुरिया गावचा रहिवासी असून जितेंद्र गोगी हा अलीपूर गावचा होता. मैत्रीत दुरावा आल्यानंतर दोघांनी वेगळी टोळी तयार केली. 2010 मध्ये दिल्लीतील कॉलेज स्टुडंट युनियनच्या निवडणुकीने या स्पर्धेला सुरुवात झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube