Salman Khan Statement recorded by police in Firing Case : सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (Galaxy Apartment) झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी आता पोलिसांकडून स्वतः सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी सलमानने गोळीबाराची घटना घडली तेव्हा आपण कुठे होतो? काय करत होतो? याची माहिती दिली. तसेच यावेळी त्याने आपल्याला येत असलेल्या सततच्या धमक्या आणि टार्गेट केलं जात असल्याने कंटाळलो असल्याचं देखील सांगितलं आहे.
बारामतीत काका-पुतण्यात फाईट? युगेंद्र पवार म्हणाले, त्यांची इच्छा…
काय म्हणाला सलमान खान?
या गोळीबार प्रकरणी जबाब नोंदवताना सलमान खानने पोलिसांना सांगितले की, गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी मी उशिरा घरी आल्याने थकून झोपलेलो होतो. त्यावेळी गोळीबाराचा आवाज झाला. मात्र बाल्कनीमध्ये कोणीही नव्हतं. तसेच सलमान खानचा भाऊ अरबाज आणि याबाबत सांगितले की, अशा प्रकारची घटना तिसऱ्यांदा घडली आहे. तर सलमान खानने पोलिसांना सांगितलं की, मी वेगवेगळ्या लोकांकडून वारंवार टार्गेट होत आहे. या सर्व गोष्टींना तसेच धमक्यांना मी कंटाळलो आहे ,निराश झालो आहे कोर्टाने मला शिक्षा देखील केलेली आहे. असं म्हणत सलमानने आपली बाजू मांडली आहे.
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?
अभिनेता सलमान खान ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटींग दरम्यान 1998 साली राजस्थानमधील जोधपूरला गेला होता. प्रत्यक्षदर्शी छोगाराम बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री एक गाडी जंगलात फिरत होती. त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीचा आवाज ऐकून अनेकांची झोपमोड झाली. त्याने छोगाराम बिष्णोई यांना उठवले. त्यांच्या राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात गोळीबाराचा मोठा आवाज ऐकायला आला. जेव्हा छोगाराम आणि त्यांच्यासोबत असलेल्या गावकर्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे शहरातले काही लोक आल्याचे पाहायला मिळाले.
मोठी बातमीः पोस्को प्रकरणात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट !
गावकऱ्यांना बघून सलमान आणि त्याच्यासोबतचे इतर काही कलाकार 2 काळवीटांना मारुन निघून गेले होते. तेथील गावकऱ्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. गाडीत सलमान असल्याचे त्यांना स्पष्ट लक्षात आले. या घटनेनंतर गावातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. या काळवीट शिकारी प्रकरणात सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम अशा बॉलीवूड कलाकारांचाही समावेश होता. पण हे सगळे कलाकार निर्दोष असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. सलमान खानची देखील या प्रकरणात जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांमधील शत्रूत्व वाढत गेले. आणि सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर आला. असं सांगितलं जात.