सलमान खानचा आज 60 वा वाढदिवस; अभिनयातील तीन दशकांचा प्रवास; असंख्य भूमिका आणि प्रेक्षकांच्या मनातील भाईजान

90 च्या दशकातील रोमँटिक हिरोपासून ते आजच्या अ‍ॅक्शन सुपरस्टारपर्यंतचा हा प्रवास चढ-उतारांनी आणि चाहत्यांच्या प्रचंड प्रेमाने भरलेला

Untitled Design (157)

Untitled Design (157)

Salman Khan’s debut at 60, his iconic roles so far : बॉलिवूडमधील सुपरस्टार, भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्या ३ दशकांपेक्षा अधिक काळापासून सलमान खान(Salman Khan) हा हिंदी चित्रपटसृष्टीत(Bollywood) सक्रिय असून त्याने केवळ चित्रपटचं नाही तर एक संपूर्ण पिढी घडवली आहे. 90 च्या दशकातील रोमँटिक हिरोपासून ते आजच्या अ‍ॅक्शन सुपरस्टारपर्यंतचा त्याचा हा प्रवास चढ-उतारांनी, यश-अपयशांनी आणि चाहत्यांच्या प्रचंड प्रेमाने भरलेला आहे.

1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खान घराघरात पोहोचला. त्या चित्रपटातील निरागस आणि प्रेमळ सुरजणे त्याला रातोरात स्टारडम मिळवून दिलं. त्यानंतर ‘हम आपके है कौन’ सारख्या कौटुंबिक चित्रपटातून सलमानने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की, प्रेक्षक आवर्जून पाहतात.

अजित पवारांची ‘ती’ मागणी अन् दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली! नेमकं काय घडलं?

मात्र सलमान खान हा फक्त रोमँटिक भूमिकांपुरताच मर्यादित राहिला नाही. तेरे नाम मधील राधेची वेदनादायी भूमिका, हम दिल दे चुके सनम मधील त्याग करणारा प्रियकर, तर दुसरीकडे वॉंटेड आणि दबंग मधील जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार, या सगळ्यातून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे सलमानने स्वतःला नेहमी वेळोवेळी नव्यानं प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे. दबंग मधील चुलबुल पांडे ही भूमिका तर त्याच्या करिअरला नवं वळण देणारी ठरली. त्या एका भूमिकेने सलमान खान हा अ‍ॅक्शन हिरो म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला.

यानंतर एक था टायगर, किक, सुलतान यांसारख्या चित्रपटांतून त्याने अ‍ॅक्शनसोबत भावनिक बाजू देखील प्रभावीपणे मांडली. सुलतानमधील एका सामान्य कुस्तीपटूचा संघर्ष, अपयश आणि पुनरागमन प्रेक्षकांना भावून गेलं. तर बजरंगी भाईजानने सलमान खानचा हलवा आणि माणुसकीने भरलेला चेहरा समोर आणला. मूक पाकिस्तानी मुलीसाठी झटणारा पवन कुमार चतुर्वेदी आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

मिनी मंत्रालयांचा बिगुल वाजणार! कसा असणार जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम

आज त्याच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. कुणासाठी दबंग हा सलमानचा सर्वोत्तम चित्रपट आहे, तर कोणाला बजरंगी भाईजान डोळ्यात पाणी आणतो. काहींना हम आपके है कौन मधील सलमानचा कौटुंबिक स्वभाव आवडतो, तर कोणाला सुलतानमधील जिद्दी सलमान प्रेरणा देऊन जातो.

सलमान खानचा प्रत्येक चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या आयुष्यातील एखादा टप्पा, एखादी आठवण. त्यामुळे आज या खास दिवशी प्रश्न एकच उरतो, तुमच्या मते सलमान खानचा सर्वाधिक आवडता चित्रपट कोणता? आणि त्या चित्रपटातलं काय खास तुम्हाला भावलं? तुमचं मत, तुमची आठवण आणि तुमच्या मनातला ‘भाईजान’ आमच्यासोबत शेअर करा. कारण सलमान खानचा वाढदिवस हा फक्त एका अभिनेत्याचा नाही, तर लाखो चाहत्यांच्या भावना आणि आठवणींचा उत्सव आहे.

Exit mobile version