Download App

Shaakuntalam First Review: ‘समांथा’ शुकंतलेची कहाणी पडद्यावर मांडण्यात अपयशी!

Shaakuntalam First Review: विश्वामित्र ऋषिंची तपस्या भंग करण्यासाठी इंद्र देवताने सुंदर अप्सरा मेनकेला पाठवले. विश्वामित्र ऋषि आणि मेनका यांची कन्या म्हणजे शकुंतला. याच शकुंतलेवर आधारित तेलुगू फिल्म (South Actress) आहे शकुंतलम. (Shaakuntalam) या चित्रपटात सौंदर्य आणि अभिनयसंपन्न साऊथ स्टार समांथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) मुख्य भूमिका म्हणजेच शकुंतलेचं पात्र साकारतेय. शकुंतलेची पौराणिक कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्याला थ्रिडी स्वरुपात मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आला आहे. मात्र ही पौराणिक कथा रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय.


चित्रपटाची कथा ही महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञान शकुंतलम वर आधारित आहे. चित्रपटाची कथा शकुंतलेच्या जन्मापासून सुरु होते. इंद्र देव विश्वामित्र ऋषिंची तपस्या भंग करण्यासाठी अप्सरा मेनकेला पृथ्वीलोकात पाठवतात. त्यानंतर विश्वामित्र आणि मेनका यांच्याच प्रेम जडतं. मेनकेला कन्याप्राप्ती होते, मात्र विश्वामित्र आणि मेनका त्या बाळाला सोडून निघून जातात. त्यानंतर कण्व ऋषि या बाळाचा सांभाळ करतात. या बाळाला शकुंत पक्षाने वाढवले असल्याने तिचं नाव शकुंतला असं ठेवण्यात येतं. त्यानंतर शकुंतलेच्या आय़ुष्यात दुष्यंत राजा कसा येतो, त्यांचं प्रेम आणि शकुंतलेला मिळालेला श्राप, ही सगळी कथा या चित्रपटात जशीच्या तशी पाहायला मिळते.

शकुंतलेच्या भूमिकेत समांथा रुथ प्रभु सुंदर दिसत आहे. मात्र आपल्या अभिनयकौशल्याने लक्ष वेधून घेणारी समांथा शकुंतलेच्या भूमिकेत कमी पडलीय. या पात्रात समरस होण्यात समांथाला अपयश आले आहे. शकुंतलेचे योग्य भाव सादर करण्यात असलगता वाटते. तर राजा दुष्यंतच्या भूमिकेत अभिनेता देव मोहनही फारसा प्रभाव पाडत नाही.

कण्व महाऋषिच्या भूमिकेत अभिनेते सचिन खेडेकर यांचं काम छान केले आहे. याशिवाय मोहन बाबू, प्रकाश राज, मधू, कबीर बेदी यासारखे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गुनशेखर यांच्या दिग्दर्शनात काही त्रुटी जाणवतात. शुकंतलेच्या कथेचा सादरीकरणातला प्रयोग फसल्याचे जाणवत आहे.


चित्रपटातील व्हिएफएस्क आणि ग्राफिक्स कमकुवत वाटतात. चित्रपटाचा बराचसा भाग क्रोमावर शूट केल्याचं जाणवतय. त्यामुळे अनेक सीन प्रभावी वाटत नाहीत. चित्रपटातील लढाईचे सीन वगळता काही सीनमधील नकली प्राणी, निसर्गदृश्ये डोळ्यांना खटकतात. व्हिएफक्समधील आधुनिकता हरवलेली जाणवते.
या चित्रपटाच्या हिंदी रुपांतर समजण्यात अनेक त्रुटी जाणवतात. किंवा ती सोप्या पद्धतीने हिंदीत रुपांतरीत करण्यात आली असती तर चांगल्या पद्धतीने सादर झाली असती. चित्रपटाची गाणीही फारसा प्रभाव पाडत नाहीत.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

या चित्रपटाचे डबिंगही कलाकारांच्या भूमिकांना न्याय देण्यात कमी पडल्याचे दिसून आले आहे. शकुंतलम या चित्रपटात समांथा मुख्य भूमिकेत असल्याने चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट सगळ्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. शुकंतलेचा जन्म ते शकुंतला आणि दुष्यंतची प्रेमकहाणी यावर सादरीकरणात बराच वाव असताना देखील पडद्यावर हे सादरीकरण खटकत असल्याचे दिसून येत आहे. मात्र शकुंतलेची कहाणी जाणून घ्यायची असेल तर हा चित्रपट पाहु शकता.

Tags

follow us