Sana Khan: धर्मासाठी बॉलीवूडला अलविदा केलं… आता प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन! 

Sana Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूडला अलविदा करणारी अभिनेत्री सना खान (Sana Khan)पहिल्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही माहिती सोशल मीडियावर (Social media) शेअर करत सनाने देवाचे आभार मानले आहे. हिंदी कलाविश्वाला अलविदा करणारी अभिनेत्री सना खानने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे.   View this post on […]

Sana Khan

Sana Khan

Sana Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूडला अलविदा करणारी अभिनेत्री सना खान (Sana Khan)पहिल्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही माहिती सोशल मीडियावर (Social media) शेअर करत सनाने देवाचे आभार मानले आहे. हिंदी कलाविश्वाला अलविदा करणारी अभिनेत्री सना खानने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे.


अनस सय्यदसोबत (Anas Syed) २०२० मध्ये लग्नगाठ बांधल्यावर २ वर्षांनी सना खान आई झाली आहे. अभिनेत्रीने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली आहे. सना खानने इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ शेअर करत तिला गोंडस मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. आणि कॅप्शनमध्ये सनाने, “अल्लाहच्या कृपेने आम्हाला गोंडस मुलगा झाला आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या मुलाच्या पाठीशी सतत राहू देत” असे लिहिले आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सना- अनसचे जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांनी देखील या दाम्पत्याला भावी आयुष्याकरिता तसेच आयुष्याच्या या नव्या इनिंगसाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. सना आणि अनस एकमेकांना २०१७ मध्ये भेटले होते. पुढे २०१८ मध्ये इस्लाम धर्माच्या परिचयासाठी सनाने अनसला फोन केला होता. त्यानंतर २ वर्षांनी दोघांनी लग्न केले होते.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

सना खान लग्नाच्या अगोदरच बॉलीवूडला राम राम ठोकला आहे. ती ‘बिग बॉस ९’मध्येही सहभागी झाली होती. परंतु २०२० मध्ये लग्न झाल्यावर तिने फिल्म इंडस्ट्री कायमची सोडली आहे. इस्लाम धर्मासाठी इंडस्ट्री सोडत असल्याचे याअगोदर तिने स्पष्ट भाषेत सांगितले होते. याअगोदर अनेक मुलाखतींच्या दरम्यान सनाने ग्लॅमरस दुनियेपासून का दूर होत असल्याचे सांगितले होते. तसेच तिने स्वतःला धर्मासाठी समर्पित केल्याचे देखील सांगितले होते.

Exit mobile version