Download App

राहुल देशपांडेंनंतर मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट; अवघ्या 5 वर्षांत विभक्त झालं दाम्पत्य

Shubhangi Sadavarte हिने आपला पती संगीतकार आनंद ओकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आनंद ओक यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.

  • Written By: Last Updated:

‘Sangeet Devbhabali’ fame actress Shubhangi Sadavarte divorces, tied knot with musician Anand Oak : नुकतच मराठी चित्रपट सृष्टीतून प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी घटस्फोट घेतल्याचं बातमी आली होती. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील घटस्फोट आपल्याला काही नवे नाहीत. पण आता मराठी कलाकारांकडूनही एका मागे एक विभक्त होण्याचे निर्णय घेतले जात आहेत. त्या आता राहुल देशपांडेंनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. तिनं आपलं अवघ्या 5 वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवलं आहे.

मोठा गंडा! सरकारी नोकरीच्या नावाखाली 18 जणांची फसवणूक; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

राहुल देशपांडेंनंतर मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट…

प्रसिद्ध मराठी नाटक संगीत देवबाभळी यातील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने आपला पती संगीतकार आनंद ओक याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वत: आनंद ओक यांनी इन्स्टाग्राम आकाउंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी 2020 मध्ये विवाह केला होता. मात्र त्यांनी आता त्यांचं 5 वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवलं आहे.

राऊतांचा डीएनए औरंगजेब-अब्दालीचा आहे का? भाजप नेत्याचा संतप्त सवाल

रंगभूमी गाजवणाऱ्या जोडीने अचानक घटस्फोट घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर घटस्फोटाच्या या पोस्टमध्ये आनंद ओक यांनी लिहिले आहे की, मी आणि शुभांगीने दोघांच्या परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हा निर्णय घेण्याअगोदर काही वेळ घेतला. त्यावर विचार केला. त्यानंतर आता आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच योग्य वेळ पाहून ही घोषणा करत आहोत.

भाजपला झुगारत निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात! नेमकं प्रकरण काय?

आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांसाठी मी शुभांगीचा आभारी आहे. तसेच मी तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ती एक उत्तम अभिनेत्री आणि व्यक्ती आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा केव्हा आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळेल. तेव्हा आम्ही एकत्र काम करू. जसे आम्ही पुर्वी करत होतो. असं म्हणत आनंद ओक यांनी इन्स्टाग्राम आकाउंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

follow us