भाजपला झुगारत निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात! नेमकं प्रकरण काय?

भाजपला झुगारत निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात! नेमकं प्रकरण काय?

Nilesh Rane Aggressive on BJP after 6 corporators suspended in Sindhudurga : सिंधुदुर्ग या राणे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यामध्ये राणे विरूद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे. कारण सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीतील नगरसेवकांचं करण्यात आलेलं निलंबन आणि त्यामुळे आक्रमक झालेले निलेश राणे. यातून आता निलेश राणे यांनी भाजपच्या निर्णयाला झुगारून सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात. असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मोठी संधी! खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

नेमकं प्रकरणं काय?

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीतील भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 8 पैकी 6 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हे निलंबन केले आहे. तसं जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे याकडे लक्ष वेधत आहे. दरम्यान भाजपचे हे नगरसेवक भाजपच्या कमी आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांना जास्त जात जातात. पक्षशिस्त पाळली जात नाही ही कारण देत हे निलंबन करण्यात आलं आहे.

Breaking! पुण्यात प्रसिद्ध अभिनेता अटकेत, लैंगिक अत्याचाराचा आरोप

मात्र या कारवाईमुळे शिवसेना म्हणजे आमदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात हे निर्णय घेण्याचे अधिकार स्वत: भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांना आहेत. असं म्हणत त्यांनी भाजपच्या निलंबनाच्या निर्णयाला झुगारले आहे. याबाबत निलेश राणे यांनी एक पोस्ट देखील केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपली ही नाराजी बोलून दाखवली आहे.

चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चा टिझर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार चित्रप

काय म्हणाले निलेश राणे?

‘मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजप चे निर्णय हे खासदार श्री राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही.’ असं म्हणत राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube