मोठी संधी! खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

मोठी संधी! खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

Maharashtra PSI Departmental Exam : राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी (Police Constable) मोठ्या संधीचं दार खुलं झालं आहे. शासनाने पोलीस उपनिरीक्षक (PSI Exam) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा (PSI Departmental Exam) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती. परंतू ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार आहे. मेहनती आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना (Police Officers) पदोन्नती मिळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मोठी बातमी! राज्यातील कामगारांचे कामाचे तास वाढले, 12 तासांची ड्युटी अनिवार्य

पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीच्या खातेअंतर्गत विभागीय परीक्षेमुळे (PSI Departmental Exam) कमी वयातच PSI पदावर पदोन्नतीची संधी आता मिळणार आहे. यामुळे पोलीस दलात तरुण आणि तडफदार अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नव्याने भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार आहे. तसेच पोलिस अंमलदारांना त्यांचे करिअर नव्या उमेदीने पुढे घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात वातावरण तापलं! मराठा-ओबीसी तणाव शिगेला, अंतरवालीत ओबीसी आंदोलनाचा आज चौथा दिवस

खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा (PSI Departmental Exam) पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र लिहिले होते. पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना PSI पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. अखेर शासनाने आज अधिकृतपणे निर्णय घेतला आहे.

भारत अमेरिकेच्या टार्गेटवर! रशियन तेलावरून तणाव शिगेला, ट्रंपचा थेट इशारा…

खात्यांतर्गत परीक्षेतून सेवाकाळ मोठा

साधारणपणे पोलीस कॉन्स्टेबल यांना सेवाकाळाच्या शेवटच्या टप्प्यात प्रमोशनद्वारे PSI पद मिळते. अशावेळी त्यांना PSI म्हणून फारतर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून PSI झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील 20 ते 25 वर्षे PSI पदावर सेवा बजावण्याची संधी मिळते. तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर सेवा देण्याचीही संधी त्यांना मिळू शकते. यामुळे पोलीस खात्यात नव्या उमेदीचे, तरुण PSI नव्या उमेदीसह कार्यरत होतील.

पुढील 48 तास महत्वाचे! 4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा कहर, विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मेहनती आणि तरूण पोलीस अंमलदारांसाठी PSI पदाचा (PSI Departmental Exam) मार्ग पुन्हा खुला झाला आहे. अन्यथा, त्यांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती. आता विभागीय परीक्षा त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीचे नवे दार उघडेल.

राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “पोलीस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलीस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय (PSI Departmental Exam) महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयामुळे पोलीस दलात नवे चैतन्य निर्माण होईल.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube