Breaking! पुण्यात प्रसिद्ध अभिनेता अटकेत, लैंगिक अत्याचाराचा आरोप

TV Actor Ashish Kapoor Arrested In Pune : मनोरंजनसृष्टीतून (Entertainment) मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूरला (TV Actor Ashish Kapoor) पुणे पोलिसांनी (Pune) अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेला बाथरूममध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा (Sexual Abuse Allegations) गंभीर आरोप करण्यात आला आहे.
बलात्कार केला असल्याचा ठपका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सुरुवातीला दोन अनोळखी पुरुषांकडून लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले होते. याशिवाय एका महिलेने तिला शारीरिक छळ केल्याचा आरोपही तिने केला. परंतु पुढे तिने दिलेल्या निवेदनात (Crime News) अभिनेता आशिष कपूरनेच तिच्यावर बलात्कार केला असल्याचा ठपका ठेवला. तसेच या अत्याचाराचा व्हिडिओ शूट झाल्याचेही तिने म्हटले आहे. मात्र पोलिसांना अद्याप कोणताही व्हिडिओ मिळालेला नाही.
पुढील 48 तास महत्वाचे! 4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा कहर, विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट
ओळख इन्स्टाग्रामवरून झाली
मीडियात आलेल्या माहितीनुसार, महिलेची आणि आशिष कपूरची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. त्यानंतर आशिषने तिला आपल्या मित्राच्या घरी दिल्लीत आयोजित पार्टीला बोलावले. पार्टीदरम्यान आशिष आणि ती महिला बाथरूममध्ये गेले. बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्याने उपस्थितांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच वाद निर्माण झाला आणि त्यावेळी एका महिलेने पीडितेला मारहाण केली.
पुढील 48 तास महत्वाचे! 4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा कहर, विदर्भ-मराठवाड्याला अलर्ट
आशिष कपूरला न्यायालयात…
पीडितेने 11 ऑगस्ट रोजी आशिष कपूर, त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर 18 ऑगस्टला तिने अधिक तपशील देत आशिष कपूर आणि त्याच्या मित्रानेच बलात्कार केल्याचा ठोस आरोप केला. तसेच या घटनेत तिच्यावर मारहाण झाल्याचेही नमूद केले. या प्रकरणाने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आशिष कपूरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.