राऊतांचा डीएनए औरंगजेब-अब्दालीचा आहे का? भाजप नेत्याचा संतप्त सवाल

BJP leader Navnath Ban Questioned Sanjay Raut : औरंगजेब (Aurangzeb) अन् अब्दालीच्या नावाने उद्धृत करत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करताना राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) प्रदेश माध्यमप्रमुख नवनाथ बन (Navnath Ban)यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
नवनाथ बन म्हणाले, पंतप्रधान ओबीसी आहेत. आमचा डीएनए ओबीसींचा आहे. पण राऊतांचा डीएनए नेमका अब्दालीचा की औरंगजेबाचा? ओबीसींचा अपमान तुम्ही का करत आहात? ओबीसींचा प्रश्न कुणी सोडवला तर तुम्हाला चिड का येते? असा थेट सवाल त्यांनी केला.
भाजपला झुगारत निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात! नेमकं प्रकरण काय?
महाविकास आघाडीवरही वार
नवनाथ बन यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला जबाबदार धरले. मराठा आरक्षण गमावण्याचं पाप महाविकास आघाडीचं, ते पुन्हा मिळवून देण्याचं श्रेय फडणवीसांना जातं. ओबीसींच्या 27% आरक्षणावर गदा घालण्याचं कामही महाविकास आघाडीनं केलं. भाजपने आणि फडणवीसांनी हे आरक्षण परत मिळवून दिलं, असं ते म्हणाले.
महायुती भक्कम, तुमची रिक्षा पलटी
महायुती सरकाराबद्दल बोलताना बन यांनी ठाम भूमिका घेतली. महायुती जनतेच्या आशीर्वादाने टिकून आहे. मतांवर दरोडा टाकून उभी केलेली महाविकास आघाडी ही डळमळीत तिघाडी होती. त्यामुळेच तुमची राजकीय रिक्षा पलटी झाली. महायुती सर्व समाजघटकांना न्याय देते आहे.
मोठी संधी! खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
भुजबळांचा राजीनामा
संजय राऊतांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर बन म्हणाले की, भुजबळांचा राजीनामा मागून तुमचं पोटदुखं थांबणार नाही. देवेंद्र फडणवीस सर्वांना सोबत घेऊन चालतात म्हणून तुम्हाला त्रास होतो. तुमच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. स्वतःच्या भावाला मंत्री करण्याची मागणी तुम्ही केली होती, पण ठाकरे-पवारांनी नाकारली. म्हणून तुम्ही भुजबळांवर टीका करताय.”
नकली चाणक्य
राऊतांच्या राजकीय शैलीवर घणाघाती हल्ला करताना बन म्हणाले, तुम्ही विधानसभा निवडणुकीत अर्ध्या मताने निवडून आलात. तुम्ही स्वतःला चाणक्य समजता, पण प्रत्यक्षात नकली चाणक्य आहात. फडणवीसांची स्ट्रॅटेजी विधानसभेत व विधानपरिषदेत सर्वांनी अनुभवली आहे. आमचा सातबारा सर्वसामान्य लोकांच्या नावावर आहे. पण अलिबागचे सातबारे बाहेर आले तर तुम्हाला तोंड काळं करावं लागेल. मुंबईकरांच्या नावावर सातबारे आहेत, त्यामुळे सातबारा प्रकरणावर बोलण्याची लायकी विरोधकांना नाही, असाही टोला यावेळी त्यांनी लगावला.