Download App

Sanjay Leela Bhansali च्या ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये दिसणार ‘हे’ ट्रॅंगल; रिलीज डेटही समोर

Sanjay Leela Bhansali : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असलेले तसेच आपल्या भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. (Sanjay Leela Bhansali) त्यांचा आगामी चित्रपट लवकरच घेऊन येत आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) आणि विकी कौशल तसेच अभिनेत्री आलिया भट हे एकत्र दिसणार आहेत.

Ajay Devgan च्या शैतानचा टीझर रिलीज; दिड मिनिटांमध्ये आर माधवच्या डायलॉग्जने उडवला थरकाप

लव अँड वॉर असे या चित्रपटाचं नाव आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. चित्रपटाची शूटिंग देखील लवकरच सुरु होणार असून हा चित्रपट 2025 मध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

माझी झोपेतच सही घेतलीयं, दुरुपयोग झाल्यास माझ्याशी गाठ; मनोज जरांगेंचा कडक शब्दांत इशारा

तर संजय लीला भन्साळी यांनी अभिनेता रणबीर कपूर यांचे खास कनेक्शन आहे. ते कनेक्शन म्हणजे रणबीर कपूर ने 2007 मध्ये त्याचा पहिला चित्रपट सावरिया हा भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली केला होता. त्यानंतर राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्या ब्लॅक या चित्रपटासाठी रणबीरने भन्साळी यांना असिस्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा यांच्यासोबत काम करणार आहे.

तर विकी कौशल्याचा संजय लीला भन्साळी यांच्या सोबत हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. तर गंगुबाई काठियावाडीनंतर आलिया ही पुन्हा एकदा भन्साळी यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. नेटफ्लिक् वर येणारी भन्साळी यांची आगामी बहुचर्चित वेब सिरीज हिरा मंडी यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील वेश्या व्यवसायावर आधारित आहे.

follow us

वेब स्टोरीज