Heeramandi: पाकिस्तानातील रेड लाइट एरियाची गोष्ट सांगणारी ‘हीरामंडी’ सीरिजची डेट जाहीर

Heeramandi: पाकिस्तानातील रेड लाइट एरियाची गोष्ट सांगणारी ‘हीरामंडी’ सीरिजची डेट जाहीर

Heeramandi Web Series : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. (Heeramandi Starcast) या सीरिजच्या पहिल्या सीझनचे शूटिंग या महिन्याच्या शेवटीपर्यंत संपेल असा अंदाज लावला जात आहे. (Web Series Story) ‘हीरामंडी’ या सीरिजचा पहिला सीझन ८ भागांचा असणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या सीरिजचे पोस्टर आणि टीझर शेअर केला होता. पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांना या सीरिजची मोठी उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सीरिजचे शूटिंग सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षाच्या शेवटी ही मल्टी स्टार सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तर या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन लगेचच 2024 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

संजय लीला भन्साळी ‘हीरामंडी’च्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. यामुळे या सीरिजकडून चाहत्यांच्या मोठी अपेक्षा आहे. ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, फरीदा जलाल, मनीषा कोइराला, संजीदा शेख, फरदीन खान आणि अध्ययन सुमन हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये पाकिस्तानातील रेड लाइट एरियाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

‘हीरामंडी’ला ‘शाही मोहल्ला’देखील सांगितले जात आहे. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती, त्यावेळेस अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानातील स्त्रिया ‘हीरामंडी’मध्ये स्थायिक झाल्या होत्या. ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. हिरामंडीची कथा भारताच्या स्वातंत्र्याअगोदर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 14 वर्षांपासून संजय लीला भन्साळी या सीरिजवर काम करत आहेत. त्यामुळे नक्कीच ही सीरिज खास ठरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु  आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube