Adipurushच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात, खास फोटो शेअर करत रणबीर कपूरने केली घोषणा
Adipurush Advance Booking : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या सिनेमाचे १० हजार तिकिटे विकत घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा हिंदीमध्ये ४ हजारपेक्षा जास्त स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. देशभरात हा सिनेमा ६ हजार दोनशे स्क्रिन्सवर रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्यापासून (10 जून 2023) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. तर रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) या सिनेमाचे १० हजार तिकीट विकत घेणार असल्याची माहिती दिली आहे.
#Xclusiv… RANBIR KAPOOR TO BOOK 10,000 TICKETS OF ‘ADIPURUSH’ FOR UNDERPRIVILEGED CHILDREN… OFFICIAL POSTER…#RanbirKapoor #Adipurush #Prabhas #KritiSanon #SaifAliKhan #SunnySingh #DevdattaNage pic.twitter.com/k30OUNvO9G
— taran adarsh (@taran_adarsh) June 8, 2023
अनाथ मुलं आणि काही खास चाहत्यांना तो हा सिनेमा दाखवणार असल्याची चर्चा आहे. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी १०० कोटी रुपयांची कमाई करू शकणार आहे. तर ६०० कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता ‘आदिपुरुष’ किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files), पठाण (Pathaan), द केरळ स्टोरी (The Kerala Story), आणि ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मोठी कमाई झाली आहे. आता या यादीमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाचा देखील समावेश होणार असल्याची चर्चा होत आहे.
‘आदिपुरुष’ या सिनेमामध्ये प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे. ‘रामायणा’वर आधारित असलेला हा सिनेमा १६ जून २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं यू सर्टिफिकेट मिळाले आहे. ‘आदिपुरुष’चं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी पसंतीस उतरल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.
Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…
ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाची कथा रामायणावर आधारित असली तरी नव्या अंदाजात ती चाहत्यांच्या समोर मांडण्यात येत आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा दुसरा ट्रेलर तिरुपतीमधील भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला आहे.
आदिपुरुष हा सिनेमा आधी ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर ही तारीख १२ जानेवारी २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. अखेर येत्या १६ जून रोजी 3D मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.