मुंबई : बॉलिवडूमधील प्रसिद्ध अभिनेता सैफअली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर विरोधकांककडून राज्यतील कायद आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी 15 दिवसांपूर्वीच सैफअली खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतल्याचा उल्लेख केला आहे. (Sanjay Raut Reaction On Saif Ali Khan Attack)
Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच…; जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका
सैफवरील हल्ला मोदींसाठी धक्का
सैफअली खानवरील हल्ल्यावर बोलताना राऊत म्हणाले की, 15 दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक तास व्यतीत केला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला होणे हे मोदींसाठी धक्कादायक आहे. सैफअली खानवर चाकू हल्ला झाला प्रधानमंत्री मुंबईत आहे त्यांच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे. पण प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यांमध्ये काय चालले आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं असे म्हणत राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
जीवाची पर्वा न करता…तैमुर खानसाठी ‘ढाल’ बनली सैफची मोलकरीण!
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था ही वाऱ्यावरती आहे. सरकार सभा, संमेलन, उत्सव ,प्रधानमंत्री यांचं आगत स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडलं आहे. त्यांच्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर घरात झोपड्यांमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसत आहेत. जे मोठे कलाकार आहेत त्यांना घराबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. तिथे सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. सैफअली खानवर हल्ला होतो हा नरेंद्र मोदी यांना हा खरं म्हणजे धक्का आहे.
सैफवरील हल्ल्यानंतर काय घडलं?; CCTV फुटेज आलं समोर….
कारण पंधरा दिवसांपूर्वी सैफअली खान व सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि त्यानंतर आता सैफअली खान वरती हल्ला झाला कोणी केला चोराने की कोणी असा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे. या राज्यात कोणीही सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. या राज्याची 90% सुरक्षा पोलीस जे काय फुटलेली लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. सैफअली खानला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आला आहे. परंतु पद्मश्री पुरस्कार असलेल्या व्यक्तीदेखील मुंबईत सुरक्षित नसल्याचे घडलेल्या या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.