‘संजय राऊत रिकामटेकडे, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही…’; CM फडणवीसांची बोचरी टीका
Devendra Fadnavis : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आलेल्या अपयशानंतर आता मविआतील घटक पक्षांत खटके उडायला सुरुवात झाली. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊतांच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) विचारले असता फडणवीसांनी राऊतांवर खोचक टीका केली.
मी राऊतांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहे, मी रिकामटेकडा नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.
फडणवीस आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, नागपूरचे दोन्ही शासकीय मेयो आणि मेडिकल हे मेडिकल कॉलेजेस जुने आहेत. या दोन्ही इमारती अनेक दशके जुन्या आहेत. त्यामुळे इमारतींचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. यासाठी १,००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मी दोन्ही ठिकाणच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी आलोय. दोन्ही ठिकाणचे काम प्रगथीपथावर आहे. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ; शरद पवार
यावेळी राऊतांच्या स्बळाच्या नाऱ्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केले, मी त्यांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.
आंबेडकरांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर अकाऊंट एक्सवर एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं की, शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला, असं गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.
संजय राऊत काय म्हणाले होते?
आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा स्वबळ आजमावून पाहायचं आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं. आम्ही नागपूरला सुध्दा स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी मला तसे संकेत दिले आहेत. आम्ही मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, असं राऊत म्हणाले.