मोठी बातमी! मविआचे खासदार फुटणार?, संजय राऊतांनी सांगितला भाजपचा डाव

  • Written By: Published:
मोठी बातमी! मविआचे खासदार फुटणार?, संजय राऊतांनी सांगितला भाजपचा डाव

Sanjay Raut on M V A MP : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. त्यानंतर आता भाजप महाविकासआघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.  (Sanjay Raut )भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून महाराष्ट्रात ‘मिशन लोटस’ राबवले जाणार? का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. याबाबात आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात.

राज्यसभा सभापती धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव का आणला?, राऊतांनी दिलं उत्तर

याआधी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले, ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही. ते तर ऑपरेशन डर होतं. पळून घाबरून गेले ते. भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे. तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही असंही राऊत म्हणालेत.

सत्ताधारी सभागृह चालू देत नाही

सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदानी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्यानुसार आम्ही अदानी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेसवर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पडळकरांच्या टीकेवर उत्तर

शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशी विधान शोभतात का? भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की, त्यांना ही भाषा वापरायला त्यांनी सांगितली आहे का? कोकणातील टिल्लू गब्बर सिंग अशी भाषा वापरतात. हे राज्याला शोभणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube