Sanya Malhotra Birthday : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती सान्या मल्होत्रा ( Sanya Malhotra ) ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते. नवनवीन भूमिका ते नावीन्यपूर्ण अभिनयाची चुणूक असलेली सान्या कायम विविध भूमिका साकारत आली आहे. दंगलमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारण्यापासून ते जवानमध्ये ॲक्शन सीक्वेन्स करण्यापर्यंत सान्याने आजवर अनोख्या भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या भूमिकांनी तिची अष्टपैलुत्व अभिनेत्री म्हणून ओळख सिद्ध केली आहे. तिच्या अष्टपैलुत्वामुळेच तिने अनेक उत्तोत्तम दिग्दर्शकां सोबत काम केलं आहे.
दंगलमध्ये सान्या मलमल्होत्रा ने नितेश तिवारी सोबत काम केलं होतं. 2016 मध्ये रिलीज झालेला, नितेश तिवारीचा दंगल अजूनही चर्चेत असलेला चित्रपट आहे. ज्याने सान्या मल्होत्राचे बॉलीवूड पदार्पण केले. अभिनेत्रीने कुस्तीपटू बबिता फोगटची भूमिका साकारली ज्यामुळे तिचे कौतुक झाले. या चित्रपटाच्या यशामुळे ती प्रेक्षकांमध्ये ‘दंगल गर्ल’ म्हणून लोकप्रिय झाली.
झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा
बधाई हो मधील सान्या मल्होत्रा ने अमित शर्मा सोबत काम करून पुन्हा एकदा ती सशक्त अभिनेत्री आहे हे दाखवून दिलं.
‘बधाई हो’ मध्ये, सान्या मल्होत्राने गर्भधारणेबद्दल सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी भूमिका केली होती. याच चित्रपटात तिने ‘मोरनी बनके’ या लोकप्रिय साउंडट्रॅकमध्ये आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांना थक्क केले.
फसवणूक नको, आरक्षण द्या; पहिल्याच दिवशी विधान भनवाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
लुडोमध्ये सान्या मल्होत्रा ने अनुराग बसू सोबत काम केलं असून सान्या मल्होत्रा नंतर अनुराग बसूच्या लुडोमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. हा चित्रपट लघुपटांचे संकलन होता आणि त्यात एक ओटीटी रिलीज होता ज्यात सान्याने एका संवेदनशील पात्राची भूमिका केली होती.
Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, ‘योद्धा’तील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणे रिलीज
जवानमध्ये अटली सोबत सान्या मल्होत्रा ने काम केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 2023 हे सान्या मल्होत्रासाठी यशस्वी वर्षांपैकी एक म्हणून उदयास आले कारण तिने Atlee’s Jawan सोबत व्यावसायिक यश अनुभवले आणि विनोदी गुन्हेगारी-नाटक ‘कथाल’ साठी प्रशंसा मिळवली.
जवानमध्ये, अभिनेत्रीने नायकाच्या महिला लीड्सच्या गटाचा एक भाग म्हणून भूमिका बजावली. नुकताच ” कठलसाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.सॅम बहादूर मध्ये मेघना गुलजार यांच्या सोबत सान्या मल्होत्रा चमकली होती. जवानच्या अभूतपूर्व यशानंतर, सान्या मेघना गुलजारच्या सॅम बहादूरमध्ये दिसली, जो सॅम माणेकशॉचा बायोपिक ड्रामा होता.