Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, ‘योद्धा’तील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणे रिलीज

Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, ‘योद्धा’तील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणे रिलीज

Zindagi Tere Naam Song Release: ‘जिंदगी तेरे नाम’ (Zindagi Tere Naam) ‘योद्धा’ (Yoddha Movie) मधील पहिले गाणे रिलीज झाले असून व्हर्सटाइल पॉवरहाऊस राशी खन्ना (Rashi Khanna) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांची अनोखी केमेस्ट्री बघायला मिळणार आहे.

कौशल किशोर यांनी लिहिलेले आणि विशाल मिश्राने गायलेले गाणे सिद्धार्थसोबतच्या तरुण पॅन इंडियाच्या स्टारची जोडी यातून बघायला मिळणार आहे. गाणे रिलीज झाल्यापासून चाहते सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्ना यांच्यातील केमिस्ट्री यातून बघायला मिळतेय. योद्धा यावर्षी 15 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राशीच्या पुढच्या थिएटरीय रिलीजमध्ये ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि विक्रांत मॅसीसोबत ‘टीएमई’ यांचा समावेश आहे.

करण जोहर निर्मित ‘योद्धा’ मध्ये राशी खन्ना आणि दिशा पटानी पहिल्यांदा सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाची तारीख जवान आणि सालारमुळं पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंतर अखेर आता येत्या 13 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या अपडेट जाणून घेण्याची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता होती. त्यानंतर आज सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Prerna Arora: प्रेरणा अरोराच्या ‘डंक- वन्स बिटन, ‘ट्वाईस शाई’चा फर्स्ट लुक रिलीज

या सिनेमाचं पोस्टर थेट 13 हजार फूट उंचीवरून लाँच करण्यात आलं आहे. दुबईमध्ये काही लोकांनी विमानातून उडी घेत थेट आकाशातून या सिनेमाचं पोस्टर लॉन्च केलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाचं पोस्टर इतक्या उंचीवरून लाँच करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.

या नवीन पोस्टरसोबतच अभिनेत्याने चित्रपटाचा टीझर कधी येणार याबद्दल मोठी अपडेट दिली आहे. या सिनेमाचा टीझर 19फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्टवर कमेंट्सचा महापूर आला आहे. सिद्धार्थला या सिनेमात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट 13 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज