नोरा फतेही पुन्हा चर्चेत, शेअर केला ‘माणिक’ गाण्याचा BTS व्हिडिओ

Nora Fatehi : अजय देवगण (Ajay Devgan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Siddharth Malhotra) स्टारर 'थँक गॉड' या चित्रपटातील 'माणिक' (Manik)

  • Written By: Published:
Nora Fatehi : नोरा फतेही पुन्हा चर्चेत, शेअर केला 'माणिक' गाण्याचा BTS व्हिडिओ

Nora Fatehi : अजय देवगण (Ajay Devgan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Siddharth Malhotra) स्टारर ‘थँक गॉड’ या चित्रपटातील ‘माणिक’ (Manik) या आयकॉनिक ट्रॅकने नोरा फतेहीने (Nora Fatehi) चाहत्यांना वेड लावले होते.

‘माणिक मागे हिते’ या व्हायरल श्रीलंकन ​​ट्रॅकचे हे गाणे हिंदी रूपांतर होते आणि या गाण्याला योहानने आवाज दिला आहे. या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि नोराची जोडीने धमाका केला होता. त्यामुळे तिच्या आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय गाण्यापैकी हे गाणं आहे.

नोराने सोशल मीडियावर काही BTS व्हिज्युअल शेअर केले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत नोराचा कौतुक केला आहे. तर एका चाहत्याने हे दृश्य चित्रपटात का नव्हते असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या चाहत्याने माणिक’ नक्कीच आयकॉनिक आहे! असं लिहिले आहे. तर एकाने नोराला विचारले की ती तिच्या ट्रॅकची स्वतःचा व्हर्जन कधी रिलीज होणार आहे. ‘माणिक’ रिलीज होताच सुपरहिट ठरला होता. या गाण्यानंतर नोरा फतेहीला इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख मिळाली होती. तसेच चाहत्यांमध्ये देखील ती लोकप्रिय ठरली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तर दुसरीकडे गेल्या काही वर्षात नोराने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने फिफा विश्वचषक अँथम ‘लाइट द स्काय’, ‘नोरा’ आणि ‘पेपेटा’ सारख्या चार्ट-टॉपिंग हिट दिले आहे. त्याच बरोबर तिने ‘दिलबर’ आणि ‘ओ साकी साकी’ यासह अनेक लोकप्रिय म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील काम केले आहे.

भारताची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये धडक, दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव

या वर्षाच्या सुरुवातीला, तिला ‘मडगाव एक्सप्रेस’ मधील तिच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली, ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत होती. येत्या काही दिवसात तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा होणार आहे. सध्या ती आपल्या या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे.

follow us