The Sabarmati Report: ‘द साबरमती रिपोर्ट’ रिलीजची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
The Sabarmati Report Release Date: संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना (Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी (Vikrant Massey ) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ ची (The Sabarmati Report ) रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. (The Sabarmati Report Release Date) हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यात राशी एका रिपोर्टरची भूमिका करताना दिसणार आहे जो साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मोहिमेवर आधारित चित्रपट असणार आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाच्या तीव्रतेची झलक देऊन एका प्रभावी पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर केली आहे.चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केलं आहे ” ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! #TheSabarmatiReport फक्त सिनेमागृहात!” रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचे तपशीलवार आधारित आहे.
याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने राशी आणि विक्रांत भूमिका कशी प्रभावी असणार आहे याची एक झलक दिली होती. ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजच्या पलीकडे राशी खन्ना पुढील चित्रपट ‘तलाखों में एक’ मध्ये पुन्हा विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची तयारी करत आहे, जो लवकरच रिलीज होणार आहे.
राशी खन्ना अन् विक्रांत मॅसी स्टारर The Sabarmati Report ची नवी रिलीज डेट समोर
अनेकांनी गमावले होते प्राण…
27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ ‘साबरमती एक्स्प्रेसला’ आग लावण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या धक्कादायक घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. हे कारसेवक अयोध्येवरून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप लावण्यात आले होते. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या आगीच्या प्रकरणी 2 चौकशी आयोग नेमण्यात आले होते.