फसवणूक नको, आरक्षण द्या; पहिल्याच दिवशी विधान भनवाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

  • Written By: Published:
फसवणूक नको, आरक्षण द्या; पहिल्याच दिवशी विधान भनवाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Opposition Leaders Hold Protest : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने आरक्षण दिल्याची घोषणा केली होती. मात्र, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येता मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सध्या त्यांचं अंतरवली सराटीत उपोषण सुरू आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला घेरलं. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, ‘योद्धा’तील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणे रिलीज 

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session)आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. ‘फसवणूक करू नका, आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचे जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर असं म्हणत सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?, राऊतांची बोचरी टीका 

यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, दुटप्पी वागणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा -ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी सरकार विरोधात निदर्शने केली.

यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, जितेश अंतापूरकर, भाई जगताप, राजेश राठोड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ गट नेते अजय चौधरी, राजन साळवी, नरेंद्र दराडे, अनिल देशमुख, सुनील भुसारा, विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा व ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या सरकारच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यामुळं आता अधिवेशनात तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होतेय का, आरक्षणाचा तिढा सुटतोय का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज