Sanya Malhotra: “जवानमध्ये काम करणे…”; सान्या मल्होत्राने सांगितला अनुभव, म्हणाली…

Sanya Malhotra: अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या ‘कटहल’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत असून, तिचा हा सिनेमा १९ मे दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. २०२३ हे वर्ष सान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असून तिचे ‘कटहल’, ‘जवान’, (Jawan) ‘सॅम बहादूर’सारखे हटके सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.(Social media) ‘जवान’ सिनेमात सान्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खान म्हणजेच किंग […]

Sanya Malhotra

Sanya Malhotra

Sanya Malhotra: अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या ‘कटहल’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत असून, तिचा हा सिनेमा १९ मे दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. २०२३ हे वर्ष सान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असून तिचे ‘कटहल’, ‘जवान’, (Jawan) ‘सॅम बहादूर’सारखे हटके सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.(Social media) ‘जवान’ सिनेमात सान्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खान म्हणजेच किंग खान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे सान्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.


तसेच अरुण कुमार दिग्दर्शित या सिनेमात किंग खान, सान्या मल्होत्रा, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत दुहेरी भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रीमियरला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, सान्या मल्होत्रा ​​’जवान’ टी-शर्टमधील स्वत:चा फोटो शेअर करून या चित्रपटाबद्दल उस्तुकता वाढवली आहे.

जवानमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सान्या मल्होत्राने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दलचा तिचा उत्साह शेअर केला आहे. तिने स्वत:चा ‘जवान’ टी-शर्ट घातलेला फोटो शेअर केला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि ती प्रेक्षकांना मनोरंजनाने भरलेल्या अॅक्शन-पॅक प्रवासात घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.

Teen Adkun Sitaram: ‘दुनिया गेली तेल लावत…’; तीन अडकून सीताराम’ लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहेत. चाहते सिनेमाच्या कथानकाबद्दल आणि किंग खानच्या वेधक दुहेरी भूमिकेबद्दल उत्कटतेने जोरदार चर्चा करत आहेत. सान्या मल्होत्राच्या फोटोने चाहत्यांचा आणखीनच उत्साह वाढला आहे. जवान हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. सान्या मल्होत्राच्या अफलातून भूमिका असलेला जवान 7 सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करत असून चाहत्यांना अ‍ॅक्शन-पॅक्ड सिनेमॅटिक अनुभवाची उत्सुकता आहे.

Exit mobile version