Teen Adkun Sitaram: ‘दुनिया गेली तेल लावत…’; तीन अडकून सीताराम’ लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

Teen Adkun Sitaram: ‘दुनिया गेली तेल लावत…’; तीन अडकून सीताराम’ लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

Teen Adkun Sitaram : ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Social media) ‘तीन अडकून सीताराम’मध्ये (Teen Adkun Sitaram) वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) अडकले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrishikesh Joshi (@hrishikesh0304)


हृषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा येत्या २९ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या घोषणेपासून यामध्ये नेमकी मनोरंजनाची काय मेजवानी असणार आहे, याबद्दल अनेकांच्या मनात चांगलीच उत्सुकता पडली आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे सिनेमाचे नाव. दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचे एक नवीन पोस्टर समोर आले आहे.

या सिनेमात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या सिनेमाचे निर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

पहिल्या पोस्टरमध्ये दिसलेल्या बेड्या आता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे आणि आलोक राजवाडेच्या हातात असल्याचे बघ्यांक मिळत आहे. त्यांच्या सोबत त्यांची साथीदार प्राजक्ता माळी देखील बघायला मिळत आहेत. यामुळे आता हे कोणत्या कारणासाठी जेलमध्ये राहणार आहेत, आणि बाकीचे त्यांना आरोपीच्या नजरेने बघत आहेत, तसेच सिनेमाच्या नावाशी या सगळ्याचा नेमका काय संबंध लावणार आहेत? याचे उत्तर सिनेमा बघितल्यावरच मिळणार आहे.

Super Human Weapon Teaser: ‘बाहुबलीतील कट्टपाच्या आगामी सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाबद्दल बोलत असताना दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणाले आहे की, हा एक कमाल विनोदी आणि कौटुंबिक सिनेमा आहे, त्यामुळे चाहत्यांना आता खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. सिनेमाची संपूर्ण टीम खरं तर खूपच भन्नाट आहे. कलाकार, निर्माते, संगीत टीम अशा सर्वांची गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. आम्ही आमच्या बाजूने चाहत्यांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे ती चाहत्यांच्या प्रतिक्रियांची. हृषिकेश जोशी यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर करत सांगितले आहे, “मासे असो वा माणसे..व्यवस्थित जाळं टाकल्यावर अडकणारच!”, त्यामुळे आता या सिनेमाची सर्वांचं आतुरता लागल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube