Download App

Saqib Saleem: ’83’ फेम साकिब सलीम सिटॅडेलचा भाग होणार का ?

Saqib Saleem: साकिब सलीम (Saqib Saleem ) हा बहुप्रतिक्षित सिटाडेल या वेब सीरिजच्या (web series) दुसर्‍या सीजनचा भाग होणार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर (Social media) होताना दिसत आहे. नेटिझन्स या नव्या सीजनसाठी उत्सुक आहेत आणि आता साकिब याचा भाग होणार का? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. साकिबने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी टाकली आहे आणि याने या चर्चांना उधाण आलं आहे.


आगामी प्रोजेक्ट: सिटाडेल वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. साकिब सलीमच्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट आणि सिटाडेल मध्ये काम करणार आहे का अश्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. 83 आणि रंगबाज मधील त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा साकिब सलीम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. साकिब सलीम येणाऱ्या वर्षात काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

नव्या इनिंगची सुरुवात: या नव्या प्रोडक्शन हाऊस च्या अंतर्गत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स ची निर्मिती होणार असल्याचं कळतंय. नव्या कथा आणि नव्या प्रोजेक्ट ची निर्मिती करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कामगिरीने प्रेक्षकांना कायम मोहित करणारा साकिब आता सिनेमॅटिक अनुभवांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊससह तो अष्टपैलू अभिनेता तर आहेच. आता नव्या इनिंगची सुरुवात करताना तो अजून उत्तम प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याचं सांगत आहे.

Jhimma 2 Box Office: 2023 वर्षात निर्माते आनंद एल यांच्या ‘झिम्मा 2’ची दमदार कमाई!

मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात : या डायनॅमिक अभिनेत्याचे काकुडा आणि क्राइम बीटमध्ये काही रोमांचक प्रकल्प आहेत जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत. साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.

Tags

follow us