Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यात; चाहत्यांची मोठी गर्दी

Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे खूपच चर्चेमध्ये येत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सारा सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. आता या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 22T113822.923

Sara Ali Khan

Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे खूपच चर्चेमध्ये येत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सारा सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. आता या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान तिने राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली, असल्याची माहिती मिळाली आहे.


सारा अली खानने नुकतीच राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे. अजमेर शरीफ दर्ग्यातील साराच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. साराला भेटण्यासाठी अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये साराच्या चाहत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळी तिने फिकट हिरव्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

तसेच डोक्यावर दुपट्टा घातला होता आणि सनग्लास लावला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सारा दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून दुआ मागत असल्याचे ती दिसून येत आहे. सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरले होते. तिच्याबरोबर तिचा बॉडीगार्ड देखील दिसून येत होते. तसेच एका फोटोमध्ये सारा अली खान तिच्या सिनेमाच्या यशासाठी दुआ मागत असल्याचे दिसत आहे.

Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

सारा अनेकदा मंदिरे आणि दर्ग्यांना भेट देत असल्याचे नेहमी दिसून येते. 2021 मध्ये सारा तिच्या आईबरोबर म्हणजेच अमृता सिंहबरोबर अजमेर शरीफ दर्गाला गेली होती. तसेच सारा अली खानचा आगामी सिनेमा ‘जरा हटके जरा बचके’ 2 जून 2023 रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये ती चाहत्यांना रोमान्स, नाट्य आणि विनोद बघायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये सारासह विकी कौशल (Vicky Kaushal) देखील मुख्य भूमिकेमध्ये झळकताना दिसून येणार आहे. तसेच राकेश बेदी, शारिब हाशमी, नीरज सूदसह अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये राहणार आहेत.

Exit mobile version