Sara Ali Khan Travels In Metro: सारा अली खानने केला मुंबई मेट्रोतून प्रवास, अनुभव सांगताना म्हणाली…

Sara Ali Khan Travels In Metro: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) प्रवास करायची खूप आवड आहे. ती अनेकवेळा तिच्या कामातून ब्रेक घेत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीपला जात असल्याचे दिसून येते. सारा ही सोशल मीडियावर (Social media) तिच्या ट्रीपचे नेहमीच फोटो शेअर करत असते. सध्या साराचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Photo […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T133259.385

Sara Ali Khan Travels In Metro

Sara Ali Khan Travels In Metro: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) प्रवास करायची खूप आवड आहे. ती अनेकवेळा तिच्या कामातून ब्रेक घेत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीपला जात असल्याचे दिसून येते. सारा ही सोशल मीडियावर (Social media) तिच्या ट्रीपचे नेहमीच फोटो शेअर करत असते. सध्या साराचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Photo Viral) होत आहे.


या फोटोत ती मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. सारा अली खानने तिचा मेट्रोमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन खास कॅप्शन लिहिले आहे. सारा अली खानने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती मुंबई मेट्रोमधून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.


तसेच तिने त्या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे, ‘मुंबई मेरी जान’ तसेच पुढे कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आदित्य रॉय कपूर आणि अनुराग बासू यांच्या अगोदर मी मुंबई मेट्रोमधून प्रवास करणार आहे, याचा मी विचार केला नव्हता. सारा अली खान ‘मेट्रो इन दिनों’ या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात आदित्य रॉय कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.

अनुराग बासू या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. सारा आणि आदित्य व्यतिरिक्त या सिनेमामध्ये अनुपम खेर, फातिमा सना शेख, अली फजल, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि नीता गुप्ता हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहेत.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

सारा अली खानचे आगामी सिनेमा

सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर यांचा ‘मेट्रो इन दिनों’ हा सिनेमा ८ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. शिवाय सारा अली खान ही ए वतन मेरे वतन या सिनेमामधून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता विक्रांत मॅसी देखील काम करणार आहे. साराच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकतेने वाट पाहात असतात.

Exit mobile version