Download App

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर पास झाली! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स

Sara Tendulkar Education Qualification: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा (Social media) विषय बनली आहे. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असते. आता लंडनमधील (London) शिक्षणामुळे सारा जोरदार चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने याबद्दल माहिती दिली आहे.


आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी सारा तिच्या चाहत्यांसोबत कायम शेअर करताना बघायला मिळत असते. सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने आपण मास्टर्स पूर्ण केल्याची माहिती सांगितली आहे. निकालाचा दिवस… असे कॅप्शन टाकत साराने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. सारा तेंडुलकरच्या निकालाची सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ मुंबई याठिकाणी पार पडलं आहे. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतल आहे. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये ‘कॉलेज ऑफ लंडन’ येथील वैद्यकशास्त्रातून मास्टर्सची डिग्री पूर्ण केली आहे. नुकताच विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.

‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील टॉवेल फाइट सीनवर विकीने सोडले मौन

सारा तेंडुलकर या कोर्समध्ये 75 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. तसेच साराची आई अंजली तेंडुलकर देखील प्रोफेशनल डॉक्टर आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त गेल्या काही वर्षामध्ये साराने मॉडेलिंग क्षेत्रामध्ये देखील स्वत:ची एक अनोखी छाप निर्माण केली आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सध्या सारा तेंडुलकरचे शुभमन गिलसोबत नाव जोडले जात आहे. या दोघांच्या अफेअयरच्या चर्चा सोशल मीडियावर वारंवार चालू असतात. सारा तेंडुलकर क्रिकेट सामने बघण्यासाठी अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.

Tags

follow us